बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन



कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का.)  : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2019-20 फलोत्पादन यांत्रिकीकरण या घटकांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 8 एचपीपेक्षा लहान पॉवर टिलर (भौतिक 1) या बाबीसाठी तसेच सामुहिक शेततळे (भौतिक 1) या बाबीसाठी इच्छूक शेतकऱ्यांनी आपले ऑफलाईन अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.  
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2019-20 अंतर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण घटकांतर्गत पॉवर टिलर व सामुहिक शेततळे या घटकासाठी हॉर्टनेट प्रणालीवर घटकनिहाय व उपघटकनिहाय अर्जाची प्रतिक्षा यादी संपली आहे. सद्य स्थितीत या घटकांचा लक्षांक जिल्हास्तरावर शिल्लक आहे. यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी बातमी प्रसिध्द झाल्यापासून 7 दिवसांच्या आत अर्ज करावेत. लक्षांकापेक्षा जादा अर्ज प्राप्त झाल्यास सोडत काढून योजनेची अंमलबजावणी मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येईल.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.