इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०




यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आयोजित
वक्तृत्व स्पर्धेत हर्षवर्धन आलासे प्रथम
कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्राच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटावर आधारित झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत हर्षवर्धन चंद्रकांत आलासे (शांतीनिकेतन, सांगली) याने प्रथम क्रमांक, अनुज्ञा दत्तात्रय माने (ग.गो.जाधव चॅरि.ट्रस्ट (पुढारी) कोल्हापूर)हिने व्दितीय क्रमांक तर प्रमोद प्रकाश सुतार  (शेंडूरे महाविद्यालय, हुपरी) याने तृतीय क्रमांक मिळविला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने या वर्षापासून प्रथमच यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनपटावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे राज्यभर आयोजन केले होते. विद्यापीठाच्या आठ विभागीय केंद्रामध्ये विभागीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या आठही विभागातून प्रत्येकी तीन क्रमांक घोषित करण्यात येतील. त्यानंतर विभागीय पातळीवरील विजेत्या स्पर्धकांची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात मार्चमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
कोल्हापूर विभागीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेले विषय- यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय व सामाजिक कार्य, लेखक व कलावंत म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे योगदान, शिक्षणाविषयी यशवंतराव चव्हाण यांचे विचार, आधुनिक महाराष्ट्राच्या जडण-घडणीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान याप्रमाणे होते. स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा विभागीय संचालक प्रा. दादासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 परीक्षक म्हणून श्रीमती एम.एस.माने व व्ही.एम. पाटील यांनी काम पाहिले. यावेळी महावीर महाविद्यालयाचे केंद्रसंयोजक प्रा. महादेव शिंदे, केंद्रसहायक प्रा. बसवराज वसद, प्रा. विजय मुतनाळे, प्रा. राजेंद्र लोहार, प्रा. सौरभ पाटणकर यांच्यासह महाविद्यालयातील समंत्रक व विभागीय केंद्राचे रविंद्र रनाळकर, संजय काटे, विजय रजपूत व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.