कोल्हापूर, दि. 6 (जि.मा.का.) : आम्हाला
व्यक्त होवू द्या..आम्ही तुमच्यातलेच आहोत.. गरज आहे तुमच्या आधाराची..अशी साद
नुकत्याच झालेल्या संवेदना जागर 2020 एलजीबीटी कार्यशाळेमध्ये सायरा खानवेलकर आणि
विशाल पिंजानी यांनी घातली.
किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.
सामाजिक बांधिलकी उपक्रम, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, अभिमान यांच्या
संयुक्त विद्यमाने सीपीआर येथे संवेदना जागर 2020 अंतर्गत एलजीबीटी (लेस्बीयन, गे,
बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर) कार्यशाळा येथील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात
नुकतीच घेण्यात आली.
या
कार्यशाळेत विशाल पिंजानी आणि सायरा खानवेलकर यांनी एलबीजीबीटी म्हणजे काय याबाबतची सविस्तर माहिती सांगून समाजामध्ये
असणारे समज-गैरसमज याबाबतही आपले अनुभव सांगितले. समाजासमोर येवून स्वत:ला व्यक्त
व्हायला हवं त्याशिवाय समाजातील गैरसमज दूर होणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी
सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि वकील दिलशाद मुजावर यांनीही
यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी
प्रास्ताविकामध्ये एचआयव्ही एड्सबाबत जिल्ह्यातील आढावा दिला.
या
वर्षी संवेदना जागर 2020 या नावाने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये कार्यक्रम
राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या ग्राफिक डिझाईन स्पर्धेतील
प्रथम क्रमांक- संदेश वास्कर, कागल, व्दितीय- प्रमोद कवाळे, तृतीय- प्राची कवाळे
आणि उत्तेजनार्थ- श्रीकांत पिसाळ सर्व कोल्हापूर.
घोषवाक्य स्पर्धेतील प्रथम
क्रमांक- तेजस्वीनी माने, व्दितीय क्रमांक- हर्षल जाधव, तृतीय क्रमांक- अनिल
पाटील, उत्तेजनार्थ-संगीता पाटील आणि तन्वी माने या विजेत्यांना प्रमुख
पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.