कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय): उपविभागीय
अधिकारी करवीर, यांच्याकडील चुकून लागलेले ब सत्ताप्रकार क करण्याबाबत आज आदेश
करण्यात आले या आदेशा मुळे 57 प्रॉपटी कार्डवरील 1348 मिळकतधारक यांचे 50810.2 चौ.मी.
क्षेत्रफळ असे मिळून एकुण 103 मिळकतपत्रिकेवरील एकूण 2530 मिळकतधारकांचे 86,223.65
चौरस मिटर क्षेत्रावरील "ब" सत्ताधकार कमी करुन " क " करण्यात
आले आहे.
जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी कोल्हापूर शहरातील प्रॉपर्टी
कार्ड उताऱ्यावरील चुकून लागलेला "ब" सत्ताप्रकार कमी करुन
"क" सत्ताप्रकार करण्याबाबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीचा उद्देश
प्रामुख्याने ज्या प्रॉपर्टी कार्ड धारकांच्या प्रॉपर्टीवर "ब"
सत्ताप्रकार अशी नोंद चुकीने झालेल्या आहेत, त्या लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मोहीम
स्वरूपात कार्यवाही करणे, त्याकरिता लोकांना स्वत:हून अर्ज करावे लागू नये. तसेच लागणारी
इतर कागदपत्रे जसे की, क ड ई पत्रक, इनाम पत्रक, चौकशी उतारा, प्रॉपर्टी कार्ड
उतारा, बॉन्ड बुक उतारा, हुजूर ठराव,
असेसमेंटचा उतारा हे न मागता प्रशासकीय पातळीवरचा या कागदपत्रांची छाननी करुन
प्रॉपर्टी कार्डवर चुकून लागलेला "ब" सत्ताप्रकार कमी करता येईल, याबाबत
जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी निर्देश दिले.
त्या अनुषंगाने तहसिल
स्तरावर तसेच नगर भूमापन अधिकारी कार्यालय यांच्या स्तरावर विशेष पथक उपविभागीय
अधिकारी करवीर यांच्या आदेशाने नेमण्यात आले. नगर भूमापन अधिकारी कार्यालय यांच्या पथकाने त्यांच्या स्तरावर 57 प्रॉपर्टी
कार्डच्या बाबतीत छाननी करून अहवाल दिनांक 29 जुलै 2020 तर तहसिल कार्यालय करवीर यांच्या
पथकाने दिनांक 10 ऑगस्ट 2020 रोजी अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयास सादर केला.
या कागदपत्रांची तपासणी करुन तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडील याच सिटी सर्व्हे
क्रमांकाच्या बाबतीत पूर्वी “ ब"
सत्ताप्रकार “क” करण्याबाबत झालेल्या आदेशांची शहानिशा करून उपविभागीय
अधिकारी करवीर यांच्याकडील दिनांक 14 ऑगस्ट 2020 रोजी सिटी सर्व्हे क्रमांकाचे
बाबतीत चुकून लागलेले “ ब"
सत्ताप्रकार “क” करण्याबाबत आदेश करण्यात आले आहेत.
या आदेशाच्या प्रती
नगर भूमापन अधिकारी कोल्हापूर, तहसिल कार्यालय करवीर, गा.का.तलाठी करवीर व कसबा बावडा
यांना देण्यात आले आहेत. तसेच या सिटी सर्व्हे क्रमांकाचे विवरण जिल्हाधिकारी
कोल्हापूर यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या आदेशामुळे 57
प्रॉपटी कार्डवरील 1348 मिळकतधारकांना लाभ होणार आहे व या आदेशातील एकूण क्षेत्रफळ
50,810.2 चौरस मिटर एवढे आहे.
यापूर्वी उपविभागीय
अधिकारी करवीर यांच्याकडील दिनांक 12 जून 2020 च्या
आदेशाने 46 मिळकत पत्रिकेवरील एकुण 1182
मिळकतधारकांचे 35,413.63 चौ.मी. क्षेत्रफळावरील व 14 ऑगस्ट 2020 च्या आदेशाने 57
प्रॉपटी कार्डवरील 1348 मिळकतधारक यांचे 50810.2 चौ.मी. क्षेत्रफळ असे मिळून एकूण 103
मिळकतपत्रिकेवरील एकुण 2530 मिळकतधारकांचे 86,223.65 चौरस मिटर क्षेत्रावरील
"ब" सत्ताप्रकार कमी करुन " क " करण्यात आले आहे.
संबंधित प्रॉपर्टी
कार्ड धारकांनी या आदेशानुसार त्यांच्या मिळकतीचे रुपांतरण शुल्क संबंधित गा.का.तलाठी
करवीर किंवा गा.का. तलाठी कसबा बावडा यांच्याकडे जमा करावयाचा आहे. त्यानंतर नगर भूमापन
अधिकारी, कोल्हापूर यांच्या कार्यालयात या जमा केलेल्या रुपांतरण शुल्काची पावती
दिल्यास प्रॉपर्टी कार्डवरील "ब" सत्ताप्रकार हा कमी करण्यात येईल. यापुढेही
ही मोहीम सुरु राहील अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिली.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.