कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय): पालकमंत्री सतेज पाटील यांनी
सी.पी.आर मध्ये साडेतीन तास बैठक घेतली. सी. पी. आर मधील प्रशासन, बेडची उपलब्धता,
ऑक्सीजनेटेड बेड, अत्यवस्थ रुग्णांबाबतचे उपचार, नव्या बेडबाबतचे कामकाज,
ऑक्सीजनचा पुरवठा, स्वच्छता या विषयांवर सविस्तर आढावा घेतला.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले सी. पी. आर
मध्ये येणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांवर प्राधान्यांने उपचार करुन त्यांना स्टेबल
करावे. त्यानंतर महा सैनिक दरबार येथील केंद्रावर संदर्भित करावे. नव्याने करण्यात
येणाऱ्या ऑक्सीजनेटेड बेड बाबतचे काम लवकरात लवकर पुर्ण करावेत. आवश्यक ती साधन
सामग्रीची उपलब्धता ठेवावी. अत्यवस्थ रुग्णांसाठी 10 बेड ठेवा.
बेड नियोजनासाठी प्रत्येक
वार्डमध्ये मोबाईल
सी.पी.आर
मध्ये उपलब्ध असणाऱ्या आणि दाखल असणाऱ्या रुग्णांच्या एकत्रित माहितीसाठी तसेच
नियोजनसाठी पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रत्येक वार्डमध्ये अँड्रॉईड मोबाईल
देऊन व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करण्याची सूचना केली. केवळ सूचना न करता स्वत: मोबाईल
वरुन संपर्क साधून 25 मोबाईल आणि सिम कार्ड तात्काळ मागवून घेतले. या ग्रुप वर
प्रत्येक वार्ड मधील बेडची माहिती, दाखल झालेले रुग्ण आणि डिस्चार्ज झालेले रुग्ण
यांची एकत्रित माहिती नियंत्रण कक्षात मिळणार आहे.
मंगळवारपर्यंत स्वच्छता
व्हायला हवी
सी.पी.आर
मधील बाथरुमची अस्वच्छता, जागोजागी, जिन्याखाली अस्ताव्यस्थ पडलेले साहित्य याबाबत
पालकमंत्री श्री. पाटील यांनी डी. एम. एजन्सीचे बाबा पाटील आणि प्रशासकीय अधिकारी
अश्विनीकुमार चव्हाण यांना चांगलेच सुनावले. मंगळवारपर्यंत सर्व स्वच्छता झाली
पाहिजे त्या शिवाय कायमस्वरुपी स्वच्छता राहिली पाहिजे. अशी सक्त सूचना त्यांनी
दिली.
या
आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अधिष्ठाता चंद्रकांत मस्के,
वैद्यकीय अधिक्षक डॉ. तेजस्विनी सांगरुळकर, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. गिरीश
कांबळे, आदी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.