गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारासाठी इच्छुक पत्रकारांनी प्रस्ताव सादर करावेत


कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): उमेद अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गटासाठी उत्कृष्ट लेखन करणाऱ्या पत्रकारांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देण्यात येतो. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत सन 2020-21 या वर्षात देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी महिला सक्षमीकरण या विषयावर उत्कृष्ट लेखन केलेल्या इच्छुक व पात्र पत्रकारांनी आपले प्रस्ताव 5 ऑक्टोबरपर्यंत  सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या सहसंचालकांनी केले आहे.

सन 2020-21 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील उमेद अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गटासाठी उत्कृष्ट लेखन करणाऱ्या पत्रकारांनी आपले नाव, पासपोर्ट साईज फोटो, दैनिकाचे नाव व केलेल्या लेखनाचे प्रस्ताव जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, कोल्हापूर येथे सादर करावेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.