कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): इ.
12 वी पुर्नरचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व तद्अनुषांगिक बाबींसंदर्भात
ऑनलाईन प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांनी
8 ऑक्टोबपर्यंत मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नाव नोंदणी करावी, असे आवाहन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले
यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक
व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील उच्च
माध्यमिक शिक्षकांसाठी इ. 12 वी पुर्नरचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व
तद्अनुषंगीक बाबींसंदर्भात सर्व विषयांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार
आहे. सर्व शिक्षकांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असून प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक
/ कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांची evaluation.mh-hsc.ac.in या
वेबसाईटवर दिलेल्या विहित प्रपत्रामध्ये आपली माहिती दि. 1 ते 8 ऑक्टोबर या
कालावधीत ऑनलाईन नाव नोंदणी करून घेण्यात येत आहे. नावनोंदणीस दिलेल्या मुदतीनंतर लिंक
बंद केली जाणार असल्याने शिक्षकांनी विहित मुदतीत आपल्या नावाची नोंदणी करावी.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.