बुधवार, २२ एप्रिल, २०२०

जिल्ह्यातील 15 हजार 923 कुटुंबांना जीवनावश्यक किट वाटप - स्मिता कुलकर्णी



       कोल्हापूर, दि. 22 (जि.मा.का) :  आजअखेर 17 हजार 157 प्राप्त किट पैकी  जिल्ह्यातील 15 हजार 923 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप करण्यात आल्याची माहिती रोहयोच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांनी दिली
       विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार कुटुंबातील 4 ते 5 लोकांना 15 दिवस पुरेल अशा पध्दतीने प्रमुख 10 जीवनावश्यक वस्तुंचा समावेश या किटमध्ये आहे. पिवळ्या अथवा केसरी अशा कोणत्याच शिधापत्रिकांच्या योजनेत न येणाऱ्या विशेषत: कामगार, मजूर वर्गातील कुटुंबांना याचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील विविध व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांच्याकडून ही मदत प्राप्त होत आहे. आजअखेर 17 हजार 157 किट प्राप्त झाले आहेत.
          करवीर-792, गगनबावडा-6 पन्हाळा-389, शाहूवाडी-96, कागल-120 राधानगरी-403, भुदरगड- 54, आजरा-804, गडहिंग्लज-108, चंदगड-136, शिरोल-781, हातकणंगले-931, इचलकरंजी नगरपालिका-3235, जयसिंगपूर नगरपालिका-35, कागल नगरपालिका-30, मुरगूड नगरपालिका-37, वडगाव नगरपरिषद-3396, कुरुंदवाड नगरपालिका-81, गडहिंग्लज नगरपालिका-56, मलकापूर नगरपालिका-796, पन्हाळा नगरपालिका-75, हुपरी नगरपरिषद-463, शिरोल नगरपरिषद-360, आजरा नगरपंचायत-65, चंदगड नगरपंचायत-225, हातकणंगले नगरपंचायत-1005, कोल्हापुरातील गांधी मैदान -352, शिवाजी मार्केट -76, बागल मार्केट-429, ताराराणी मार्केट - 627 जिल्ह्यातील तालुक्यात, नगरपालिका आणि कोल्हापूर महापालिका अशा 30 केंद्रातील 15 हजार 923 कुटुंबांना या जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले आहे, असेही श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या.
0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.