कोल्हापूर, दि. 19, (जि. मा.
का.) : आपल्या आस्थापनेवरील कामगारांची राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करू
शकतील, केवळ अशा उद्योगांनी आपले उद्योग मर्यादित स्वरुपात कमीत कमी कामगार घेवून
करण्याबाबत http://permission.midcindia.org
या संकेतस्थळावर अर्ज करावेत. कामगार किंवा कर्मचारी यांना परवानगी देण्याबाबत तालुकास्तरावर तहसिलदार यांना इंसिडंट कमांडर म्हणून नेमण्यात आले
आहे. तहसीलदारांना त्या त्या विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी सहकार्य करतीलव
प्रत्यक्ष उद्योग सर्व निर्धारित उपाय योजना करीत आहेत का? याची तपासणीही
त्यांच्याकडून करण्यात येईल. अंतिम परवानगी ही तहसीलदारांकडून देण्यात येईल. या
आस्थापनांच्या कामगारांना कोणत्याही प्रकारे वाहतुकीची
परवानगी देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांनी केले आहे.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात
संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काही क्षेत्रात विशेष खबरदारी घेऊन काही
प्रमाणात सूट देण्यात आली आहे. एमआयडीसी व सहकारी औद्योगिक वसाहतीमधील उद्योग घटकांना
सुचित करण्यात येते, जे उद्योग घटक आपल्या आस्थापनेवरील कामगारांची राहण्याची
व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करु शकतील अशा आस्थापनांनी आपले उद्योग मर्यादित
स्वरुपात सुरु करण्याबाबत http://permission.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज
करावेत. कामगार किंवा कर्मचारी यांच्यासाठी ग्रामीण भागात त्या त्या विभागाचे
अधिकारी अर्ज स्वीकारतील अंतिम परवानगी ही तालुकास्तरावरुन तहसीलदार यांच्याकडून
दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिली.
तसेच
ग्रामीण भागातील उद्योग घटकांनी त्यांच्या कामगारांची सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून त्याच
आस्थापना आवारात राहण्याची व्यवस्था करावी.
सर्व
उद्योग घटकांनी महाराष्ट्र शासनाचे आदेश क्र. DMU/2020/CR.92/DisM-1 दि. 17 एप्रिल
2020 मधील परिशिस्ट II मध्ये नमूद केलेल्या कामाच्या ठिकाणी पाळावयाच्या सोशल
डिस्टन्सिंग एसओपी (Standard Operating Procedure) चे पालन करणे अनिवार्य आहे,
असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.