कोल्हापूर,
दि. 18 (जि.मा.का) : कागल तालुक्यालगतच्या बेळगाव
जिल्ह्याच्या सीमा भागातील गावांमध्ये 17 कोरोना बाधित रुग्ण असल्याची बाब
निदर्शनास आली. त्यामध्ये संकेश्वर येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील
लिंगनूर कापशी, हणबरवाडी, बाळेघोल, बाळीक्रे, अर्जुनी, अर्जुननगर, चिखली खडकेवाडा,
जैन्याळ, गलगले, कौलगे, सिध्दनेर्ली, वंदूर, शेंडूर, शंकरवाडी, म्हाकवे, गोरंबे, लिंगनूर दुमाला,
करनूर, सूळकूड, इत्यादी गावे संकेश्वर पासून 20 कि. मी. परिसरात म्हणजेच
कन्टेंमेंट झोनमध्ये येतात. सीमेलगतच्या चिक्कोडी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग
क्र. 4 वगळता इतर गावांतील सर्व रस्ते जीवनाश्यक वस्तूंच्या वाहतुकीसह सर्व
प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी रामहरी भोसले
यांनी आज दिले.
या
आदेशात म्हटले आहे, कागल तालुक्यालगतच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याच्या
सीमेलगतच्या काही गावामध्ये आज एकाच दिवशी दि. 17 एप्रिल 2020 रोजी 17 कोरोना
बाधित रुग्ण असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामध्ये संकेश्वर येथील 1 रुग्णाचा
समावेश आहे.
कागल
तालुक्यातील नमूद केलेल्या गावांसह इतर तालुक्यातील नागरिकांची संकेश्वर अथवा
बेळगांव जिल्ह्यातील इतर ठिकाणी दैनंदिन कामकाजासाठी ये-जा चालू असते आणि त्यामुळे
संबंधित 1 कोरोना बाधित रुग्ण अथवा त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांचा कागल
तालुक्यातील नागरिकांशी संपर्क आला असल्याची अथवा भविष्यात सदर कोरोना बाधित
व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींशी संपर्क येण्याची शक्यता नाकाराता येत नाही.
कागल
तालुक्यातील जीवनाश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असून गरज पडल्यास उपविभागांतर्गत
त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार आहे. सीमेलगतच्या चिक्कोडी तालुक्यातील राष्ट्रीय
महामार्ग क्र. 4 वगळता इतर गावांतील सर्व रस्ते जीवनाश्यक वस्तूंच्या वाहतुकीसह
सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद करणे आवश्यक आहे.
फौजदारी
प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार सर्व रस्ते पुढील आदेश होईपर्यंत
जीवनाश्यक वस्तुसह सर्व वस्तुच्या वाहतूकीसाठी बंद करण्याचा आदेश दिला आहे. कागल पोलीस
निरीक्षकांनी व मूरगुड सहा. पोलीस निरीक्षकांनी,
तात्काळ सर्व सीमा सर्व प्रकारच्या
वाहतुकीसाठी बंद करुन तेथे कडेकोट बंदबस्त ठेवावा. राष्ट्रीय महामार्ग क्र 4 वरुन
कोगनोळी टोल नाका महामार्ग केवळ अत्यावश्यक सेवेकरीता खुला राहील. या मार्गावर
तपासणी नाका कार्यरत ठेवून सर्व वाहने व प्रवाशांची काटेकोर तपासणी करुन
अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली गैरवापराने वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
या
आदेशाचे पालक न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेवर भादंसं 1860 (45) यांच्या कलम 188 आणि आपत्ती
व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे
फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.