शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

भाजीसाठी कुटुंबातील एकानेच तेही चालत यावे गर्दी टाळा अन्यथा वेगळा विचार करावा लागेल -डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी



            कोल्हापूर, दि. 10 (जिमाका)- भाजी खरेदीसाठी कुटुंबातील एकानेच तेही चालत यावे. भाजी खरेदीच्या नावाखाली होणारी गर्दी टाळावी अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, असा विनंतीवजा इशारा महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिला.

       नागरिकांच्या सोयीसाठी त्यांच्या घराजवळ, त्यांच्या प्रभागामध्ये भाजी विक्रेत्यांचे विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी भाजी खरेदीसाठी आपल्या प्रभागामध्ये, घराजवळ चालत जावे. वाहनांचा वापर टाळावा, अशी विनंती डॉ. कलशेट्टी यांनी केली आहे. घरी सुरक्षित रहावे, बाहेर होणारी गर्दी टाळावी असे आवाहन करुन  ते पुढे म्हणाले, नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा तेही कुटुंबातील एकानेच भाजी खरेदीसाठी बाहेर पडावे. प्रभागाच्या बाहेर अजिबात खरेदीसाठी जावू नये. भाजी खरेदीच्या नावाखाली अन्य ठिकाणी फिरु नये. अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही डॉ. कलशेट्टी यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.