कोल्हापूर, दि. 13 (जि.मा.का) :- मालवाहू वाहने, दुधाचे टँकर इतर
ट्रक यामधून प्रवाशी वाहतूक झाल्यास वाहन मालक, चालक व वाहन वापरणारी आस्थापना व
त्यांना मदत करणारा या सर्वा विरुध्द केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, महाराष्ट्र
कोविड उपाय योजना नियम 2020 व साथरोग अधिनियम 1897 अन्वये गुन्हा दाखल होईल. याची
पूर्व कल्पना देवून तसेच प्रतिज्ञापत्र संबंधितांकडून घेण्यात यावे.असे आदेश
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
सहकारी
संस्थेचे उप निबंधक दुग्ध व्यवसाय सहायक निबंधक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी
यांना पाठविलेल्या या आदेशात म्हटले आहे, जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू
(कोविड-१९) प्रतिबंधक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. राज्यात साथरोग
अधिनियम-१८९७ च्या अनुषंगाने, महाराष्ट्र कोव्हीड उपाययोजना नियम २०२० नियम
अस्तित्वात आले असून ते दि.१४.०३.२०२० पासून लागू करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात कोरोना
प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. पुणे-मुंबई सांगली अशा
ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात उद्भवला आहे.
अत्यावश्यक
बाब म्हणून मालवाहू वाहने, दुधाचे टँकर, ट्रॅक इत्यादीची कोल्हापूरहून मुंबई पुणे
सांगली अशा ठिकाणी ये-जा चालू असते. याच वेळी सर्व प्रवासी वाहनांना कोल्हापूर
जिल्हा बंदी घालण्यात आली आहे. त्याचवेळी मालवाहू वाहनांना सक्षम प्राधिकारी
यांच्याकडून परवानगीची गरज नाही अशा मालवाहू वाहनातून उदा. पालेभाजी दुधाचे टँकर,
इतर ट्रक यामधून प्रवासी वाहतूक केली जाऊ शकते व एखादा कोरोना बाधित रुग्ण सुद्धा
जिल्ह्यात प्रवेश करू शकतो.
याकरिता
याद्वारे सर्व दूध संघानी, मार्केट कमिटीनी, वाहतूक संघटनांनी सर्व वाहन चालक मालक
यांना याचे उल्लंघन होणार नाही व उल्लंघन झाल्यास संबंधित वाहन मालक-पालक व वाहन
वापरणारी आस्थापना व त्यांना मदत करणारा या सर्वांविरुद्ध केंद्रीय आपत्ती
व्यवस्थापन अधिनियम-२००५, महाराष्ट्र कोव्हीड उपाय योजना नियम २०२० व साथरोग
अधिनियम-१८९७ तसेच अन्वये गुन्हा दाखल होईल. याची पूर्व कल्पना द्यावी व तसे प्रतिज्ञापत्र
संबंधितांकडून घ्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.