कोल्हापूर, दि. 21 , (जि. मा. का.) : जिल्ह्यातील 854 उद्योजकांनी
ऑनलाईन परवान्यासाठी अर्ज केले असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी
धनंजय इंगळे यांनी दिली.
आपल्या आस्थापनेवरील कामगारांची
राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करू शकतील, केवळ अशा उद्योगांनी आपले उद्योग
मर्यादित स्वरुपात कमीत कमी कामगार घेवून करण्याबाबत http://permission.midcindia.org
या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते.
कोविड-19 चा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काही
क्षेत्रात विशेष खबरदारी घेऊन काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. एमआयडीसी व
सहकारी औद्योगिक वसाहतीमधील उद्योग घटकांना सुचित करण्यात येते, जे उद्योग घटक
आपल्या आस्थापनेवरील कामगारांची राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करु शकतील
अशा आस्थापनांनी आपले उद्योग मर्यादित स्वरुपात सुरु करण्याबाबत http://permission.midcindia.org
या संकेतस्थळावर अर्ज करावेत. कामगार किंवा कर्मचारी यांच्यासाठी ग्रामीण भागात
त्या त्या विभागाचे अधिकारी अर्ज स्वीकारतील अंतिम परवानगी ही तालुकास्तरावरुन
तहसीलदार यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच
ग्रामीण भागातील उद्योग घटकांनी त्यांच्या कामगारांची सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून त्याच
आस्थापना आवारात राहण्याची व्यवस्था करावी.
काल सोमवारी जिल्ह्यातील 660 जणांनी आणि आज 194 जणांनी उद्योग सुरु करण्याबाबत ऑनलाईन अर्ज केले आहेत.
या 854 जणांना ॲटोजनरेटनुसार त्यांना परवानगी मिळत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या
वाहतुकीचा परवाना हा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात येणार आहे, असे
श्री. इंगळे म्हणाले..
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.