गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

सीमा भागातील तालुक्यांनी सतर्क रहावे -जिल्हाधिकारी दौलत देसाई



       कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : नजिकच्या बेळगाव जिल्ह्यात कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव झाला आहे. याचा संसर्ग आपल्या जिल्ह्यामध्ये होवू नये यासाठी सीमा भागातील गावांनी विशेषत: चंदगड, गडहिंग्लज, कागल, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील गावांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या.
       नजिकच्या बेळगाव जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव झाला आहे. या जिल्ह्याच्या नजिक प्रामुख्याने  चंदगड, गडहिंग्लज, कागल, हातकणंगले आणि शिरोळ या तालुक्यांच्या सीमा आहेत. या भागातून होणारी वाहतूक काटेकोरपणे नियंत्रित करावी, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी पोलीस विभागाला आज दिले आहेत. बेळगाव जिल्ह्यामधून आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची सर्वच यंत्रणेने दक्षता घ्यावी. विशेषत: सीमा भागातील गावांनी होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे.  पोलीस यंत्रणेसह सर्वच यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे, अशीही सूचना दिली आहे.
0 0 0 0  0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.