कोल्हापूर, दि. 13
(जि.मा.का) :- आजअखेर परदेश प्रवास करुन
आलेल्या 816 जणांचा 14 दिवस कालावधी पूर्ण झाला आहे. तर बाधित शहरातून आलेल्या 75
हजार 939 जणांचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी दिली.
परदेश
प्रवास करुन आलेल्या 820 जणांची सीपीआर येथे तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 816
जणांचा 14 दिवासाचा कालावधी पूर्ण झाला आहे. उर्वरित चार जण घरी देखरेखीखाली आहेत.
पुणे, मुंबई व इतर बाधित शहरातून आलेल्या 81 हजार 22 प्रवाशांपैकी 75 हजार 939
जणांचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. 5 हजार 83 जणांना घरी अलगीकरण करण्यात
आले असून 634 प्रवाशांना संशयित लक्षणे दिसून आल्याने त्यांना संदर्भ सेवा दिलेली
आहे.
आजअखेर एकूण 755 स्वॅब तपासणीसाठी
आजअखेर एकूण
755 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यापैकी केवळ 5
पॉझिटिव्ह आले तर 531 निगेटिव्ह आले आहेत. प्रयोगशाळेकडून 40 नमुने नाकारण्यात
आले. तर 179 नमुन्यांचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे.
0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.