कोल्हापूर, दि. 24
(जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी
मंडळाच्यावतीने नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांच्या खात्यावर थेट मदत देण्यात येत असल्याने मदतीबाबत बांधकाम
कामगारांनी कोणत्याही दलाल व एजंटापासून सर्तकता बाळगावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.
लॉकडाऊनमध्ये
बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रूपयांचा थेट लाभ हस्तांतरण (DBT) व्दारे
करण्यात येत आहे. या मदतीबाबत काही दलाल बांधकाम कामगारांच्या घरोघरी जावून
बांधकाम कामगारांना तुमचे पैसे येणार असून यासाठी काही ठराविक रक्कम द्या व तुमचे
कागदपत्रे द्या असे सांगून फसविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम
कामगारांनी दलालांच्या अथवा एंजटाच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच अशा पध्दताने
कोणी फसवणूक करीत असेल तर त्यांची तक्रार जवळील पोलीस ठाण्यात बांधकाम कामगारांनी
करावी. तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून कोठेही गर्दी करू नये व प्रशासनाला
सहकार्य करावे, असे आवाहनही सहायक कामगार आयुक्त श्री. गुरव यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.