शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

रक्तदान, माजी सैनिक नोंदणीसाठी वाढता प्रतिसाद -संजय शिंदे



       कोल्हापूर, दि. 17 (जि.मा.का) : जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध आवाहनाला जिल्ह्यामधून वाढता प्रतिसाद मिळत आहे. 1 हजार 420 दात्यांनी तर 493 माजी सैनिकांनी संकेतस्थळावर आपली नोंदणी केली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे यांनी दिली.
          जिल्ह्यातील कोरोना प्रादूर्भाव सद्यस्थितीतील रक्ताची उपलब्धता आणि संभाव्य गरज याची तयारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने  http://www.kolhapurcollector.com/blooddonation/  हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर आजअखेर 1 हजार 420 दात्यांनी आपली नोंदणी केली आहे. अद्यापही ज्या दात्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी या संकेतस्थळावर नोंदणी करावी. आवश्यकतेनुसार त्यांना रक्तदानासाठी बोलवण्यात येईल.
          कोरोना शत्रूला हरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdPhhl8CrRqbWp0dT-KObPn9lreH8txJMM-EEGcaYFOAeAV9g/viewform या गुगल फॉर्म लिंक वर 493 माजी सैनिकांनी  आपली माहिती भरून आपला सहभाग नोंदवला आहे. इच्छुक ९२ माजी सैनिक पोलीस अधीक्षकांकडे विविध ठिकाणी कार्यरत झालेले आहेत. अद्यापही कोरोना या अदृश्य शत्रूशी चालू असलेल्या लढाईत आपण आपल्या क्षमतेनुसार सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.
          कोरोना विरुध्दच्या युध्दात नाग‍रिकांना तातडीने मदत व मार्गदर्शन व्हावे यासाठी, जिल्हा प्रशासन व कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या संकल्पनेतून तसेच आई टी असोशिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या सहकार्यातून https://kolhapuriwarriors.com हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. यावर एका सामाजिक संस्थेने आणि 287 जणांनी वैयक्तिक नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील तसेच बाहेरील इच्छुक डॉक्टर्स, दवाखाने, संस्था तसेच नागरिकांना मदत कार्याकरिता यावर आपली नोंदणी करता येणार आहे.
          बाहेर गावाहून आलेल्या 71 हजार 286 जणांनी आपली माहिती भरलेली आहे. ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून eZee ॲपमध्ये 1 हजार 442 ग्रामसमिती / प्रभाग समित्या त्यांच्या कामकाजाची  माहिती भरत  आहेत. हाय रिस्कमधील  382 जणांना वैद्यकीय तपासणीच्या सूचना फोन करून देण्यात आल्या आहेत. 
          जिल्ह्यातील  सर्व अधिकारी, कर्मचारी, यांचा समन्वय https://mh-dit.webex.com/join/collector.kolhapur या शासकीय व्हिडीओ कॉन्फरन्स सॉफ्टवेअरद्वारे करण्यात येत आहे.
कोरोना विषाणू विरूध्द लढा संपर्कासाठी संकेतस्थळ व क्रमांक
अ.क्र.
ऑनलाईन माहिती
संकेतस्थळ/ मोबाईल क्रमांक
1
तक्रार निवारण- कोव्हीड कंट्रोल रूम -
व्हॉटस् ॲप क्रमांक 
9356716563/
9356732728/
9356713330/
9356750039/
9356716300
2
टेलिमेडिसीन हेल्पलाईन
9555990088
3
जिल्हा आपत्ती मदत निधी देणे
https://securepayments.payu.in/kolhapurdrf

4
व्यक्ती व संस्थांकडून जिल्हा प्रशासनास वैद्यकीय व बिगर वैद्यकीय मदत देणे
5
रक्तदान नोंदणी
6
बाहेरून आलेल्या व्यक्तींनी माहिती भरावयाचा फॉर्म
7
माजी सैनिकांसाठी नोंदणी

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.