शनिवार, ११ एप्रिल, २०२०

जिल्ह्यामध्ये १८ हजार २९६ मे टन खते उपलब्ध एप्रिल अखेर आणखी १२ हजार मे टन होणार उपलब्ध -पालकमंत्री सतेज पाटील



            कोल्हापूर, दि. ११ (जिमाका)- सध्या जिल्ह्याची रासायनिक खतांची गरज ही १५ हजार मे टनाची असून जिल्ह्यामध्ये सध्या युरिया, डी ए पी, संयुक्त व मिश्र खते मिळून १८ हजार २९६.६६ मे टन खते उपलब्ध आहेत. एप्रिल अखेर आणखी १२ हजार मे टन खते उपलब्ध  होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
            पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, कोरोना आपत्तीच्या कालावधित शेतीपिकांसाठी रासायनिक खतांची मागणी जिल्ह्याच्या काही भागातून होत आहे. या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांची खतांची गरज भागविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. 
              सध्या एप्रिल महिन्याची विविध रासायनिक खतांची गरज ही १५ हजार मे टन असुन शासनाकडून जिल्ह्याकरिता १५९५८ मे टन खतांचे आवंटन मिळाले आहे. जिल्ह्यामध्ये सध्या युरिया, डी ए पी, संयुक्त व मिश्र खते मिळून १८ हजार २९६.६६ मे टन खते उपलब्ध आहेत. 
     तालुकानिहाय उपलब्ध खते
 करवीर- ३६६६.२५ मे टन,
कागल- १२३१.६२ मे टन, 
राधानगरी-९२४.८५ मे टन
गगनबावडा- १३२.९६ मे टन
हातकणंगले- ४५९.३८ मे टन
शिरोळ- ७३०.६५ मे टन
पन्हाळा- ७३९.१० मे टन
शाहूवाडी- १६५.८० मे टन
आजरा- ९८३.४० मे टन
गडहिंग्लज- ३८६.९० मे टन
भुदरगड- ३००.५० मे टन
चंदगड- ५६४२.९० मे टन
जिल्हास्तर-२९३२.३५० मे टन
            सध्या युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणावर येत आहे. युरिया खत मिळत नाही अशा तक्रारीही येत आहेत. मात्र, जिल्हास्तरावर २९३२.३६५ मे टन युरिया उपलब्ध असून जिल्हास्तरावरुन तालुका पातळीपर्यंत पुरवठा करण्याचे काम सुरु आहे. येत्या चार दिवसात पुढीलप्रमाणे युरिया उपलब्ध होणार आहे.
तालुकानिहाय उपलब्ध होणारी खते
 करवीर-४२३.११५ मे टन
कागल- ३१७.२८० मे टन
राधानगरी-४०३.०४० मे टन
गगनबावडा- ३६.५६० मे टन
हातकणंगले- ५५.९१० मे टन
शिरोळ- १८३.१९० मे टन
पन्हाळा- २२७.४३० मे टन
शाहूवाडी- ११९.७०० मे टन
आजरा- २२१.५२० मे टन
गडहिंग्लज- १९१.५२० मे टन
भुदरगड- ३८९.०२० मे टन
चंदगड- ३६४.०८०
            एप्रिल अखेर आणखी १२ हजार मे टन खते उपलब्ध होणार असून, यात युरिया, डी ए पी व संयुक्त कतांचा समावेश आहे. सध्याचा प्रश्न फक्त खते वाहतुकीचा असून, लोडींग करण्यासाठी हमाल, कामगारांची अडचण सोडविण्यात येत आहे. कोणत्याही खतांची कमतरता भासू दिली जणार नाही, त्या दृष्टीने नियोजन व प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.