गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

कोव्हिड केअर आणि कोव्हिड हेल्थ रुग्णालयासाठी दानशुरांनी मदत करावी -जिल्हाधिकारी दौलत देसाई


       कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : शिवाजी विद्यापीठ आणि संजय घोडावत विद्यापीठ या ठिकाणी प्रत्येकी 500 खाटांचे कोव्हिड केअर आणि कोव्हिड हेल्थ रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी वैद्यकीय उपकरणासह विविध मदतीची गरज आहे. जिल्ह्यातील दानशुरांनी पुढे येवून https://kolhapuriwarriors.com या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  आज केले.
       कोव्हिड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी  सामना करण्याकरता जिल्हा प्रशासनामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. येथील शिवाजी विद्यापीठ आणि संजय घोडावत विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 500 खाटांचे कोव्हिड केअर आणि कोव्हिड हेल्थ रुग्णालय सुरु करण्यात येत आहे. या रुग्णालयासाठी वैद्यकीय व्यावसायिक, पॅरामेडीकल, वॉर्डबॉय, परिचारिका, फार्माशिस्ट, आरोग्य सेवक, वैद्यकीय उपकरणे, दवाखान्यात लागणारे इतर साहित्य, विविध प्रकारच्या सेवा, संगणक, तांत्रिक सेवा, अशा विविध प्रकारच्या सेवा आणि वस्तुंची रुग्णालयासाठी आवश्यकता आहे. जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती तसेच सामाजिक संस्थांनी पुढे येवून मदत करावी. ही मदत  वैयक्तिक किंवा संस्थेच्या माध्यमातून ज्यांना द्यायची आहे, अशांनी https://kolhapuriwarriors.com या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी, असे आवानही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.  
 0 00 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.