शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेमार्फत 5 हजार उकडलेल्या अंड्यांचे वाटप






        कोल्हापूर, दि. 17 (जि.मा.का) :- सीपीआर रूग्णालयातील विलगीकरण कक्ष, अहोरात्र सेवा बजावणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी अशांसाठी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेमार्फत 5 हजार उकडलेली अंडी  राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील काटकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सुपूर्द केली.
        सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पशुवैद्यकीय सेवा करणारे पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी, पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांच्या माध्यमातून 5 हजार उकडलेली अंडी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सुपूर्द केली. ही अंडी सीपीआर रूग्णालय, विलगीकरण कक्ष, यामधील समाविष्ट असलेल्या व्यक्ती तसेच अहोरात्र सेवा बजावणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी व इतर सहाय्यकांना वाटप करण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, जिल्हा अध्यक्ष डॉ. बी.आर.बाळाण्णा, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अतुल जाधव आदी उपस्थित होते. तर डॉ. सचिन पाटील डॉ. आर.वाय माने, डॉ. अजय कुरणे, डॉ. प्रमोद खोपडे, डॉ. सचिन माने, डॉ. रवी कांबळे, डॉ. उत्तम पाटील आदींनी पुढाकार घेतला.
0000
       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.