कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा
माहिती कार्यालय): महिला व बाल विकास भवनमध्ये विभागाची
सर्व कार्यालये एका छताखाली येणार
असल्याने योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल. जिल्ह्यात महिला बाल विकास भवनसाठी
जिल्हा परिषद जागा उपलब्ध करून देईल, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग
पाटील यांनी दिले.
जिल्हा परिषदेमध्ये सुरु करण्यात आलेल्या महिला व बाल विकास भवनचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बाल कल्याण सभापती पद्माराणी राजेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ, शिक्षण सभापती प्रविण यादव, आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, समाज कल्याण सभापती स्वाती सासने आदी उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, महिला व बाल
विकासाच्या योजना राबविणारी कार्यालये एका छताखाली आल्याने महिलांना त्याच्या
योजनांचा लाभ सहज आणि सुलभपणे घेता येईल. महिला व बाल विकास भवनसाठी जागा देण्याबरोबरच
सर्व सहकार्य केले जाईल, असेही श्री.पाटील म्हणाले.
एकाच छताखाली कार्यालये आल्याने महिलांच्या
योजना राबविण्यास मदत होईल. महिला व बाल विकास विभागाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य
असल्याचे मत महिला व बाल कल्याण सभापती पद्माराणी पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मित्तल म्हणाले,
महिला व बँक विकास भवनमध्ये महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ,
महाराष्ट्र राज्य मिल आयोग आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालये एकत्र
आणली जाणार आहेत. जिल्हा परिषद मध्ये सुरु करण्यात आलेल्या या भवनातून महिला
विकासाच्या योजनांची गतीने अंमलबजावणी होईल.या भवनसाठी जिल्हा परिषद मार्फत जागा
देण्यासाठी मदत केली जाईल.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.