कोल्हापूर,
दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके सन 2021-22
अंतर्गत, कडधान्य व तृणधान्य प्रमाणित बियाणे वितरण ( तुर, मुग, उडिद, ज्वारी,
नाचणी) ही कार्यक्रम महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी
दिनांक 15 मे पर्यंत https://mahadbtmahait.gov.in
या संकेतस्थळावर महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
प्रमाणित
बियाणे वितरण या बाबीचे महाडीबीटी प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जामधून आर्थिक
लक्षांकाच्या अधिन राहून ऑनलाईन लॉटरी पध्दतीने शेतकऱ्याची निवड करण्यात येईल.
निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना या घटकाचा लाभ देण्यात येणार आहे.
प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके
अंतर्गत, खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरणासाठी पुढीलप्रमाणे अनुदान
अनुज्ञेय राहील- कडधान्य- 10 वर्षा
आतील अधिसुचित वाण, किमतीच्या
50 टक्के किंवा 5 हजार रुपये प्रति क्विंटल तुर, मुग,
उडिद व 10 वर्षा वरील अधिसुचित वाण, किमतीच्या
50 टक्के किंवा 2 हजार 500 रुपये प्रति क्विंटल तुर, मुग,
उडिद.
तृणधान्य- सुधारित बियाणे -10 वर्षा आतील अधिसुचित वाण, किमतीच्या
50 टक्के किंवा 3 हजार रुपये प्रति क्विंटल नाचणी, ज्वारी व 10 वर्षा वरील
अधिसुचित वाण, किमतीच्या 50 टक्के किंवा 1 हजार 500 रुपये प्रति क्विंटल ज्वारी.
या कामासाठी जवळच्या सामुहीक सेवा केंद्राची मदत घेवू शकता तसेच यामध्ये
कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा आपल्या तालुक्यातील कृषी विभागाशी
संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात येत आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.