रविवार, २३ मे, २०२१

बाजार समित्या, मार्केट मधील गर्दी टाळण्यासाठी -जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या दिनांक  23/05/2021 रोजीचे रात्रौ 12.00 वा ते. दिनांक 01/06/2021 रोजी सकाळी 7.00 वा ते सकाळी 11.00 वा. या कालावधी मध्ये सुरू राहणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बाजार समित्या, मार्केट या ठिकाणी सदर कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन अशा ठिकाणी कोव्हीड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असलेचे दैंनदिन अहवालावरून दिसून येत आहे.

त्यामुळे कोल्हापूर जिल्हयातील विविध बाजार समित्या, मार्केट या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.  त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बाजार समित्या, मार्केटच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आदेश जारी केले आहेत.

    1.     बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जावून माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तीक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही या शर्तीवर सुरू राहणेस परवानगी आहे. या निर्देशानूसार कार्यवाही होत असल्याची खात्री करणेत यावी.

2.         कोल्हापूर जिल्हयातील विविध बाजार समित्या, मार्केट या ठिकाणी 'मास्क नाही - प्रवेश नाही' 'सामाजिक अंतर नसेल तर वितरणही नाही ' या आदेशाचे काटेकोरपणे पालन विक्रेते व ग्राहक यांचेकडे होत आहे अगर कसे? याबाबतची तपासणी करणेकामी विशेष पथके नेमावीत. 

3.         विक्रेते व ग्राहकांकडून योग्य सामाजिक अंतर राखले जात आहे, मास्कचा वापर केला जात आहे याविषयी खात्री करणे व सदरचे उल्लंघन होत असल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करणेत यावी. विक्रेत्याकडून यांचे वारंवार उल्लघन होत असल्यास सदर दुकाने कडक निर्बध जोपर्यत लागू आहेत, तोपर्यत बंद करणेत यावीत.

4.         अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने एकत्रित असलेल्या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिक एकत्र येत आहेत अशा ठिकाणाबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती अनुषांगीक उपाययोजना करणेत याव्यात. तसेच सदर दुकाने चालू राहणेच्या वेळा व दिवस निश्चित करून द्याव्यात.

5.         अत्यावयश्यक सेवाची ठिकाणे ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोव्हीड -19 चा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत होणार नाहीत, याबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणेत याव्यात.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.