कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा
माहिती कार्यालय) : खरीप २०२१ मध्ये ९८ टक्के पाऊस पाडण्याचा अंदाज भारतीय
हवामान विभागाने वर्तविला आहे. त्या अनुषंगाने बी- बियाणे, खते यांची
उपलब्धतता , वितरण , गुण
नियंत्रण आणि कृषी विस्तार विषयक
कार्यक्रम या दृष्टीने कृषि विभागाची असलेले नियोजन, तयारी याची माहिती
शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची
आहे.
त्या
संदर्भात दूरदर्शन
सह्याद्रि वाहिनीवरील कृषी दर्शन या कार्यक्रमात कृषी आयुक्त धीरज कुमार यांची विशेष मुलाखत दिनांक २१ मे रोजी सायंकाळी ६.०० ते ६.३० या दरम्यान प्रसारित
होणार असल्याची माहिती कृषी उपसंचालक, (मा)
पुणे यांच्यावतीने देण्यात आली आहे.
0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.