सोमवार, १० मे, २०२१

जिल्ह्यात 8 लाख 75 हजार जणांनी घेतला पहिला डोस

 


 

कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) :  वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8 लाख 75 हजार 563 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

 यामध्ये एकूण 40 हजार 818 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 21 हजार 222 जणांनी दुसरा डोस घेतला.  55 हजार 293 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 22 हजार 042 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख 76 हजार 445 नागरिकांनी पहिला डोस तर 49 हजार 003 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.  18  ते 45 वर्षे वयोगटातील 11 हजार 852 जणांनी पहिला डोस तर 84 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 91 हजार 155 नागरिकांनी पहिला डोस तर 94 हजार 332 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 75 हजार 563 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 86 हजार 683 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

00000

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.