मंगळवार, २५ मे, २०२१

शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बेरोजगार युवक-युवतींसाठी येत्या शुक्रवारी दुपारी 3 ते 4 या वेळेत कृषी क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगार संधी या विषयावर श्रीमती भाग्यश्री पवार-फरांदे (कृषी उपसंचालक) जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.

       या मार्गदर्शन सत्राचा जास्तीत-जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा, कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी केले.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.