गुरुवार, ६ मे, २०२१

राजर्षी शाहू महाराजांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन

 








कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 99 व्या पुण्यतिथीनिमित्त आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दसरा चौकातील व शाहू स्मारक भवन येथील राजर्षी शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

 यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक,  जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, शाहू स्मारकचे व्यवस्थापक कृष्णाजी हरगुडे, युवराज कदम, अवधूत पाटील आदी उपस्थित होते

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.