कोल्हापूर,
दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : दिव्यांगांना त्यांच्या दैनंदिन गरजा
भागविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून 40 टक्के पेक्षा जास्त
दिव्यांगत्व असलेल्या प्रत्येक दिव्यांगासाठी 350 रू. प्रमाणे सानुग्रह अनुदान
देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सर्व पंचायत समितीकडे 86
लाख 91 हजार 550 रू. इतके अनुदान वर्ग करण्यात आले आहे. पंचायत समितीकडून
दिव्यांगांना त्यांचे अनुदान ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आले असल्याची माहिती
जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.
पालकमंत्र्यांनी
दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना वेगळी रांग करण्यात यावी.
लसीकरणासाठी येणाऱ्या आजारी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांच्यासमवेत एक
मदतनीस व्यक्ती घेण्यास परवानगी देण्याबाबत सूचित केले आहे. तसेच दिव्यांगांसाठी व
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य संस्थेमध्ये व्हिल चेअर उपलबध् करून देण्याबाबतही
सूचित केले असल्याचे श्री. घाटे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.