कोल्हापूर,
दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : शिशू आधार केंद्र, जरग नगर या संस्थेमध्ये
काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आलेले बालक (चि. पूजा) हिचे पुनर्वसन
करण्याच्या दृष्टीने तिला कायमस्वरुपी कुटुंब मिळण्यासाठी कायदेशीर दत्तक
प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. या बालकाच्या (पुजाच्या) संदर्भात कोणाला पालकत्व
सांगावयाचे असल्यास बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत बाल कल्याण समिती,
मंगळवार पेठ अथवा महिला जीवन संवर्धक मंडळ, माझे माहेर, संचलित शिशू आधार केंद्र,
जरग नगर येथे योग्य त्या कागदपत्राच्या पूराव्यासह पालकत्वाबाबतचा दावा करावा.
मुदतीनंतर पूजाच्या पूनर्वसन/ दत्तक प्रक्रिये संदर्भात सुरु केलेली प्रक्रिया
कोणत्याही परिस्थितीत थांबविली जाणार नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
एस. डी. शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या बालकाच्या माता-पिता पैकी कोणीही गेल्या 1
वर्षापेक्षा जास्त चौकशी करण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे पूजाला कायमस्वरुपी
कुटुंब मिळण्यासाठी म्हणजेच कायदेशीर दत्तक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यादृष्टीने
या बालकाच्या (पूजा) संदर्भात कोणाला पालकत्व सांगावयाचे असल्यास बातमी प्रसिध्द
झाल्यापासून 30 दिवसाच्या आत बाल कल्याण समितीकडे योग्य त्या कागदपत्राच्या
पूराव्यासह पालकत्वाबाबत दावा करावा.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.