कोल्हापूर,
दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 2910 प्राप्त अहवालापैकी 2610 अहवाल निगेटिव्ह तर 283 अहवाल
पॉझिटिव्ह (17 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 2274 प्राप्त
अहवालापैकी 1764 अहवाल निगेटिव्ह तर 510 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब
मध्ये 980 प्राप्त अहवालापैकी 574 निगेटिव्ह तर 406 पॉझीटिव्ह असे एकूण 1199 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर 49 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात
आजअखेर एकूण 92 हजार 170 पॉझीटिव्हपैकी 74 हजार 842 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 14140 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1199 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-31 भुदरगड-23, चंदगड-7,
गडहिंग्लज-117, गगनबावडा-13, हातकणंगले-192, कागल-18, करवीर-116, पन्हाळा-43, राधानगरी-23, शाहूवाडी-23,
शिरोळ-94, नगरपरिषद क्षेत्र-127 कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 270, इतर जिल्हा व
राज्यातील-270 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,
नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-2100, भुदरगड- 2530,
चंदगड- 2180, गडहिंग्लज- 3471, गगनबावडा- 360, हातकणंगले-9273, कागल-3122, करवीर-10628,
पन्हाळा- 3707, राधानगरी-1962 शाहूवाडी-2497, शिरोळ- 5551, नगरपरिषद क्षेत्र-11583,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 27 हजार 430 असे एकूण 86
हजार 395 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 5 हजार 775 असे मिळून एकूण 92 हजार 170 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या
आहे.
जिल्ह्यातील एकूण 92 हजार 170 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 74
हजार 842 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 3 हजार 188 जणांचा मृत्यू झाला
असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 14140 इतकी
आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.