रविवार, १६ मे, २०२१

रेमडीसीव्हीर, प्राणवायू प्रकल्पाबाबत पालकमंत्र्यांनी घेतला आढावा रेमडीसीव्हरच्या वापराबाबत रुग्णालयांकडून माहिती घ्या - पालकमंत्री सतेज पाटील

 



कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : प्रशासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या रेमडीसीव्हीरची माहिती रुग्णालयांकडून घ्यावी. त्यामध्ये ज्या रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात आला, त्या रुग्णांचे नाव, संपर्क क्रमांकासह माहितीचा समावेश असावा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

       पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून रेमडीसीव्हीरचा पुरवठा, प्राणवायूची सद्यस्थिती, पी एस ए ऑक्सीजन जनरेटर प्रकल्प याबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, आदी उपस्थित होते.

       पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडून रुग्णालयांना देण्यात येणाऱ्या रेमडीसीव्हीर इंजेक्शनबाबत माहिती ठेवावी. या माहितीमध्ये रुग्णालयांनी ज्या रुग्णांसाठी त्याचा वापर केला. त्या रुग्णांचे नाव, संपर्क क्रमांक, रुग्णालयाचे नाव अशी माहिती प्रशासनाने घ्यावी. पी एस. ए ऑक्सीजन जनरेटर प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्याबाबत प्रयत्नशील रहावे.

जिल्ह्याला 50 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर

पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉर्मस, इंडस्ट्रीज व ॲग्रीकल्चर प्रणित पुणे प्लॅटफॉर्म कोव्हिड रिस्पॉन्सच्या मिशन  प्राणवायू प्रकल्पाव्दारे पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 50 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर कोल्हापूर जिल्ह्याला दिले आहेत. यातील चंदगडसाठी 10, राधानगरीसाठी 10, संजय घोडावत विद्यापीठ रुग्णालयासाठी 20 आणि इचलकरंजी येथील रुग्णालयासाठी 10 देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सी. पी. आरसाठी 4 आणि महापालिका रुग्णालयासाठी 1 बायपॅकही मिळाले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.