कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): गोकुळ-शिरगाव पोलीसांनी रक्त चंदन वृक्षाची
अवैध वाहतूक करणारा जप्त केलेला ट्रक क्र.TN-37-AV-4763 सरकार जमा करायचा आहे. या
ट्रकबाबत कोणत्याही व्यक्तीस त्याबाबत मालकी /दावा सिध्द करावयाचा असेल त्यांनी ही
जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून 7 दिवसात त्यांचे लेखी म्हणणे (पुराव्यासह)
स्वत: अथवा आपल्या प्रतिनिधीसह (अधिकार पत्रासह) वनक्षेत्रपाल, करवीर यांच्या
कार्यालयात निम्नस्वाक्षरीकर्ता यांचे कक्षात कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस
वगळून ) सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या वेळेत सादर करण्याचे आवाहन सहाय्यक
वनसंरक्षक (वनीरकण व कॅम्प) एस.डी. निकम यांनी केले आहे.
रक्त चंदन
या वृक्षाची अवैध वाहतूक करणारा ट्रक क्र.TN-37-AV-4763 गोकुळ शिरगांव पोलीसांनी
दि. 31-08-2012 रोजी जप्त केला होता. न्यायालयाच्या आदेशाने हा ट्रक वनक्षेत्रपाल
करवीर यांच्या ताब्यात देण्यात आला होता.
ट्रकबाबत
निम्नस्वाक्षरीकर्ता यांना प्राप्त अधिकाराअतंर्गत भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम
61 नुसार कायमस्वरूपी सरकार जमा करण्याची
कार्यवाही करायची आहे. विहित कालावधीत याबाबत कोणाचीही तक्रार अगर दावा प्राप्त न
झाल्यास उपरोक्त ट्रकबाबत एकतर्फी कार्यवाही करणेत येईल, असेही श्री. निकम यांनी
या पत्रकात नमुद केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.