कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -
अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप
हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकीट या बाबींसाठी
इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी दि. 20 मे पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली असून 20 मे पर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला
जाईल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी कळविले आहे.
कडधान्य ( पिके - तूर, मुग व उडिद ) बियाणासाठी
10 वर्षाच्या आतील वाणास 50 रू. प्रती किलो व 10 वर्षावरील वाणास 25 रू. प्रती
किलो तसेच तृणधान्य ( पिके- नाचणी व ज्वारी ) बियाणासाठी 10 वर्षाआतील वाणास 30
रू. प्रती किलो व ज्वारी बियाणासाठी 10 वर्षावरील वाणास 15 रू. प्रती किलो किंवा किंमतीच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देय आहे.
प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.
पीक
प्रात्यक्षिकासाठी कडधान्य ( पिक - तुर, मुग, उडिद ), आंतरपीक प्रात्यक्षिके ( तूर
व सोयाबीन ) व तृणधान्य कार्यक्रमामधील पिक प्रात्यक्षिके ( पिक - वरई, नाचणी व ज्वारी
) एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा
स्वरुपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममुलद्रव्ये,
भु सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला 1 एकरच्या मर्यादेत एका
पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार 2 ते 4 हजार प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्वावर
अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने
जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.
शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करताना
महत्वाच्या बाबी -
1.
अनुदानाचा लाभ घेणेसाठी खालील संकेतस्थळावर महाडीबीटी
प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. ( http://mahadbtmahait.gov.in )
2.
महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सविस्तर
सुचना वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3.
मार्गदर्शक
सुचनेमध्ये काही बदल झालेस त्याप्रमाणे प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल.
4.
ऑनलाईन
पध्दतीने महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक - 20 मे, 2021
राहिल.
5.
सदर
कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घेवू शकता. तसेच यामध्ये
कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास आपल्या तालुक्यातील कृषि विभागाशी संपर्क साधावा,
असे आवाहन करणेत येत आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.