कोल्हापूर,
दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोव्हिड-19 मुळे दोन्ही पालक गमविलेल्या
बालकांच्या संबंधी सुरक्षितेबाबत व दोन्ही पालक गमविलेल्या बालकांना त्यांचे न्याय
हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन व उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर
कृतीदल (Task Force) गठीत करण्यात आलेली आहे. या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे.
या
बैठकीतील सदस्य पुढीलप्रमाणे- महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक
शैलेश बलकवडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे, जिल्हा बाल
कल्याण समितीचे अध्यक्ष वैशाली हिंगमिरे-बुटाले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल
माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर,
समन्वय –जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एस.एन. दाते, सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल
विकास अधिकारी एस. डी. शिंदे आदिंचा या समितीत समावेश आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.