मंगळवार, २५ मे, २०२१

जागतिक तंबाखू नकार दिनाचे आयोजन

 



   कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 31 मे जागतिक तंबाखू नकार दिन म्हणून साजरा केला जातो. कोव्हिड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन 31 मे रोजी सामाजिक अंतर ठेवून जागतिक तंबाखू नकार दिन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी दिली.

जागतिक तंबाखू नकार दिनाच्या अनुषंगाने 31 मे ते 5 जून या आठवड्यात आकाशवाणी केंद्र व इतर रेडीओ चॅनेल्सवर तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत आणि तंबाखू सोडण्याच्या फायद्याबाबत विनाशुल्क माहिती प्रसारित करण्यात येणार आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.