रे
कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): रंकाळा रोड येथील महालक्ष्मी हॉस्पीटलसाठी 30 एप्रिल
2021 रोजी 1 ड्युरा सिलेंडर व 7 जम्बो सिलेंडर
असा पुरवठा करण्यात आला होता. याठिकाणी आज पाहणी केली असता 7 जम्बो सिलेंडर्स भरलेले
असल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त निखील मोरे यांनी दिली.
श्री. मोरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले
आहे, जिल्ह्यामध्ये कोविड 19 (दुसरी लाट) संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून बाधित
रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आज 1 मे रोजी महालक्ष्मी हॉस्पीटल
रंकाळा रोड येथे ऑक्सीजन अभावी एका रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते
व समाजमाध्यमाद्वारे महानगरपालिकेस समजले. उपायुक्त श्री. मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.
योगिता मोरे, नियंत्रण कक्ष प्रमुख युवराज जबडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता
याठिकाणी 30 एप्रिल 2021 रोजी 1 ड्युरा सिलेंडर
व 7 जम्बो सिलेंडर असा पुरवठा करण्यात आला होता. याठिकाणी आज पाहणी केली असता 7 जम्बो
सिलेंडर्स भरलेले असल्याचे निदर्शनास आले.
या संदर्भातील अधिक माहिती घेण्यात येवून चौकशीसाठी हॉस्पीटल
प्रशासनाकडून रूग्णांबाबत सर्व माहिती घेण्यात येत आहे. चौकशीअंती दौषींवर योग्य
ती कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही म्हटले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.