कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती
कार्यालय): जिल्ह्यामध्ये कोव्हीड -19 विषाणूचा फैलाव रोखणेसाठी जिल्हास्तरावरील
अधिकारी व ग्राम / प्रभाग समित्यांनी दक्ष राहून कोविड प्रतिबांधासाठी केलेल्या
उपाय योजना व नियमांची काटेकोर अमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी नुकतेच दिले आहेत.
२१ मे रोजी जिल्हास्तरावरील अधिकारी व
ग्राम / प्रभाग समिती यांचेसमवेत व्हीडीओ कॉन्फरन्स आयोजित करणेत आलेली होती.
बैठकीमध्ये कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक राबविणेबाबत सूचना देण्यात आल्या.
प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग
म्हणून महाराष्ट्र शासनाकडील आदेशानूसार जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी कोल्हापूर
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश
निर्गमित करणेत आलेले आहेत. तथापी कोल्हापूर जिल्ह्यात कोव्हीड -19 संसर्गाच्या
प्रादुर्भावात वाढ होत असून कोव्हीड -19 बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात
निर्दशानास येत आहे. तसेच कोव्हीड -19 बाधित रुग्णांच्या मृत्युदरामध्ये ही वाढ
होताना दिसून येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामधील जास्तीत जास्त कोव्हीड -19 बाधित रुग्ण हे गृह
अलगीकरणामध्ये राहून उपचार घेत आहेत. सदर कोव्हीड -19 बाधित रुग्णांची तसेच
त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयित सर्व व्यक्ती यांची वेळीच माहिती घेऊन
त्यांच्या तपासण्या (RTPCR / Antigen Test) करणे अत्यावश्यक आहे. तथापी कोव्हीड
-19 बाधित रुग्णांच्या संपर्कातील
जास्तीत जास्त व्यक्तींचे Contact Tracing त्वरीत न केल्यामुळे व सदर संपर्कात
आलेल्या व्यक्तींच्या तपासण्या वेळीच न झालेमुळे कोव्हीड -19 संसर्गाचा
प्रादुर्भावामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सदर संपर्कातील व्यक्तीपैकी बाधित
व्यक्तींचे निदान होण्यास विलंब होत असल्यामुळे तसेच सदर संशयित व्यक्ती घरच्या
घरीच काहीतरी उपचार घेत असल्यामुळे कोव्हीड -19 बाधित रुग्णांच्या मृत्युदरामध्ये
ही मोठी लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे.
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोव्हीड -19 संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणेसाठी व
बाधित रुग्णांच्या मृत्युदराचे प्रमाण कमी करणेकामी शासनाकडून व इकडील
कार्यालयाकडून यापूर्वी वेळोवेळी निर्गमित करणेत आलेल्या कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक
उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यासअनुसरून खालीलप्रमाणे सूचना देणेत येत आहेत.
I) प्रतिबंधीत क्षेत्राची कडक अंमलबजावणी करणे –
1) कोव्हीड -19 बाधित रुग्ण
आढळून आलेनंतर त्वरीत सदरचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करून सदर
प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये नागरिकांच्या हालचाली प्रतिबंधीत करणे व प्रतिबंधीत
क्षेत्रासाठी यापूर्वी निर्गमित करणेत आलेल्या सूचनांची कडक अंमलबजाणी करणेत यावी.
2) प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये
कोव्हीड -19 बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींच्या RTPCR
/ Antigen Test त्वरीत करणेत याव्यात.
3) प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये
तात्काळ पथके नियुक्त करून सर्व्हेक्षण पूर्ण करून घेऊन त्यांच्या नोंदी घेण्यात
याव्यात. 60 वर्षावरील व व्याधीग्रस्त
नागरीकांचे तापमान, पल्स, ऑक्सीजन पातळी, 6 Min Walk Test इ. तपासणी वारंवार
करण्यात यावी.
4) ILI / SARI, कोरोना सद्दष्य
लक्षणे असलेल्या नागरिकांची Rapid Antigen तपासणी करून त्यांना त्वरीत अलगीकरण
केंद्रात स्थलांतरीत करणेत यावे.
5) गंभीर रुग्णांना त्वरीत
रुग्णांलयामध्ये पाठविणेत यावे. तपासणी अहवाल – Ve असलेले तथापी लक्षणे असलेल्या व्यक्तींना
तसेच कोव्हीड बाधित रुग्णांच्या
संपर्कातील व्यक्तींना त्यांचे RTPCR अहवाल येईपर्यत संस्थात्मक विलगीकरण केंद्रात
स्थलांतरीत करणेत यावे.
6) प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये
वेळोवेळी निर्जतूकीकरण करणेकामी औषधांची फवारणी करणेत यावी.
7) प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये
समाविष्ठ असलेल्या वर्दळीचे ठिकाणे असलेले उदा. किरणा माल दुकान, भाजीपाला दुकान,
औषधे दुकाने इत्यादी व्यक्तींची Antigen Test
करणेत यावी.
8) प्रतिबंधीत क्षेत्राची 14
दिवस प्रभावी अंमलबजावणी करणेत यावी.
II) कोरोना -19 विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकारेपणे
अंमलबजावणी करणेकामी ग्राम / प्रभाग समिती जास्तीत सक्रिय करून त्याचे सनियंत्रण
करणे. –
1)
ग्राम / प्रभाग
समितीच्या मदतीने कोव्हीड -19 +Ve रूग्ण संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचे
त्वरीत
Contact Tracing करणे. आरोग्य यंत्रणा व ग्राम / प्रभाग समिती मार्फत सदरबाधित
व्यक्तींच्या
संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करणे व त्यांचे स्वॅब घेणे.
2) ग्रामस्तरावर / प्रभाग
स्तरावर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विलगीकरण व्यवस्था
( शाळा, हॉल, सभागृहे)
तयार करणे.
3) ज्यांना स्वतंत्र राहण्याची
व्यवस्था नाही अशा रुग्णांचे गृहविलगीकरण बंद करावे. कमी लक्षणे
असलेले तथापी कोव्हीड -19 +Ve असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाऐवजी ग्राम /
प्रभाग स्तरावर
तयार करणेत आलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये त्वरीत स्थंलातर करणे.
ज्या रुग्णांना जास्त
लक्षणे आहेत, त्यांना जवळच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये त्वरीत पाठविणे.
4) संस्थात्मक विलगीकरण
केंद्राममधील व्यक्तींची स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने दैंनदिन तपासणी
करणेत यावी. (तापमान, पल्स,
ऑक्सीजन पातळी इ.) सदर व्यक्तीमध्ये काही
गंभीर लक्षणे
आढळून आल्यास त्यांना
नजिकच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये / रुग्णालयामध्ये त्वरीत संदर्भीत
करणे.
5) सदर संस्थात्मक विलगीकरण
केंद्राममध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व मुलभूत सुविधा / औषधे
पुरविणेत याव्यात. व सदर
सदर केंद्राचे सर्व नियंत्रण ग्राम / प्रभाग समितीमार्फत करणे.
6) शासकीय / खाजगी आस्थापना
यांचे प्रवेशव्दार, परिसर, याठिकाणी प्रभावी व वारंवार स्वच्छता व
निर्जतुकीकरण केले जाईल,
सॅनिटायझरचा वापर पुरेसा प्रमाणात केला जाईल, याबाबत स्थानिक
प्रशासनाशी संपर्क साधून
कार्यवाही करणे.
7) स्थानिक प्राधिकरणाकडून
कोव्हीड -19 च्या वाढता संसर्ग लक्षात घेता, नागरिकांमध्ये जनजागृती
करणेसाठी स्थानिक पातळीवर
नियोजन करणे व प्रसार माध्यमाव्दारे जनजागृती करणे.
8) परदेश प्रवास किंवा
जिल्हयाबाहेरून आलेल्या व्यक्तीबाबत 7 दिवस अलगीकरण करणे.
9) ज्या व्यक्ती नियमांचे पालन करत
नसतील तर त्यांना तात्काळ CCC/DCH मध्ये पाठविण्यात यावे.
10) समुह संसर्ग रोखणेबाबत
अनावश्यक गर्दी, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय मेळावे
यावर बंदी असलेने, असे
कार्यक्रम होणार नाहीत याबाबत दक्षता घेणे.
11) स्थानिक स्वराज्य संस्था /
आरोग्य विभाग / पोलीस विभाग यांचेमार्फत संबंधित क्षेत्रामध्ये
नागरिकांच्याकडून मास्कचा वापर
बंधनकारक करून त्याची कडक अंमलबजावणी करणे. "मास्क
नाही- प्रवेश नाही",
"सामाजिक अंतर नसेल तर वितरणही नाही" याची स्थानिक आस्थापना,
ग्राहक, नागरिक यांचेकडून
अंमलबजावणी करणे.
12) महाराष्ट्र शासन व इकडील
कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेल्या कोरोना विषाणू
संसर्ग साखळी तोडण्यासाठी
प्रतिबंधात्मक आदेशांची गावपातळी पर्यत / प्रभागामध्ये
अंमलबजावणी करणे.
13) कलम 144 आणि संचारबंदीच्या
अनुषंगाने ग्राम समिती / प्रभाग समिती मार्फत सार्वजनिक
ठिकाणी कोणत्याही
नागरिकांस वैध कारणाशिवाय फिरण्यास / एकत्र येण्यास मज्जाव करणे.
14) अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त
20 लोकांना परवानगी असेल याबाबत समितीमार्फत जनजागृती
करणे व देखरेख करणे.
15) केवळ शासकिय काम म्हणून नव्हे
तर सामाजिक जबाबदारीच्या भावनेने सर्व ग्राम व प्रभाग
समिती यांनी कोव्हिड-19 ला
प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत राहावे.
III) सर्व्हेक्षण -
1)
गाव / प्रभाग
पातळीवर वॉर्ड निहाय नियोजन करून गतवर्षीप्रमाणे 50 वर्षावरील सर्व व्यक्तींचे
महाआयुष सर्व्हेक्षण करण्यात यावे.
2) कोरोना उपचाराबाबत व भिती न
बाळगता त्वरीत तपासण्या करणे, वेळेत उपचार घेणे याबाबत
प्रबोधन करणेत यावे.
3) आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक
यांचेमाध्यमातून 60 वर्षावरील सर्व व्यक्तींचे व 45
वर्षावरील व्याधीग्रस्त
सर्व व्यक्तींचे 100 % सर्व्हेक्षण करण्यात यावे.
4) सर्व्हेक्षणात लक्षणे आढळून
येणाऱ्या व्यक्तींची Antigen तपासणी अनिवार्य करणेत करणेत
यावी. + Ve रुग्ण आढळून
आल्यास त्यांना व्तरीत संस्थात्मक विलगीकरणे केंद्रात / कोव्हीड
काळजी केंद्रात संदर्भीत
करणेत यावे.
5) ILI / SARI, कोरोना सद्दष्य
लक्षणे असलेल्या नागरिकांची Rapid Antigen तपासणी करून
त्यांना त्वरीत अलगीकरण
केंद्रात स्थलांतरीत करणेत यावे.
IV) स्थानिक डॉक्टरांचा सहभाग –
1)
ताप, सर्दी, घसादुखी
इत्यादी लक्षणे असणाऱ्या व्यक्ती स्थानिक डॉक्टरमार्फत उपचार घेत
असतात. अशा सर्व स्थानिक डॉक्टर यांना त्यांचेकडे
कोव्हीड सदृष्य लक्षणांच्या उपचारासाठी येणाऱ्या सर्व व्यक्तींची Antigen Test /
RTPCR करणे बधंनकारक करण्यात यावे .
2) सर्व स्थानिक डॉक्टर यांनी
ज्या व्यक्तींना तपासणीसाठी संदर्भीत केले आहे अशा सर्व व्यक्तींच्या
नोंदी घेऊन सदरची माहिती
ग्राम / प्रभाग समितीला देणेत यावी.
3) ग्राम / प्रभाग स्तरावर तयार
करणेत आलेल्या संस्थात्मक विलगीकरणा केंद्रामधील सर्व रुग्णांची
स्थानिक डॉक्टर यांचेमार्फत
दैंनदिन तपासणी करणेत यावी. व त्याअनुषंगाने डॉक्टरांच्या
अभिप्रायानूसार पुढील
औषधोपचारासाठी CCC / DCH ला संदर्भीत
करणे.
V) कोवीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजना – लसीकरण नियोजन व व्यवस्थापन -
1) आरोग्य यंत्रणेच्या मदतीने
गावनिहाय व मतदान केंद्रनिहाय लसीकरणाचे नियोजन करावे. तसेच
प्रभाग समितीमार्फत नगरपालिका
क्षेत्रातही प्रभाग निहाय लसीकरणाचे नियोजन करावे.
लसीकरणात खालीलप्रमाणे टप्पे
करावेत.
i) 60 वर्षावरील सर्व शिल्लक
नागरिकांचे व 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्याधिग्रस्त नागरिकांचे
प्राधान्याने लसीकरण
ii) त्यानंतर 45 ते 60 वर्षे
वयापर्यंतच्या नागरिकांचे लसीकरण
iii) लसीच्या उपलब्धतेप्रमाणे 18
ते 45 वर्षे वयापर्यतच्या नागरिकांचे लसीकरण
2) सामाजिक अंतर- लसीकरणाच्या
ठिकाणी सामाजिक अंतर राखले जाईल व गर्दी होणार नाही
याची दक्षता घ्यावी.
3) लसीकरण केंद्रावर 60
वर्षावरील नागरिकांना तसेच अपंग नागरिकांसाठी स्वंतत्र रांगेची व्यवस्था
करण्यात यावी.
4) सर्व लोकप्रतिनिधींचा सहभाग- लसीकरण मोहिमेत सर्व लोकप्रतिनिधी यांचा सक्रिय
सहभाग
राहिल याबाबत यंत्रणांनी
पुढाकार घ्यावा.
5) ग्रामसमितीचा पुढाकार- लसीकरण
मोहिमेत ग्रामसमितीतील सदस्य, पोलीस पाटील, कोतवाल
यांनी सर्व पात्र लोकांचे
लसीकरण करुन घेण्यासाठी सक्रीय पुढाकार घ्यावा. त्याचप्रमाणे
आपत्तीचे वेळी काम करणाऱ्या
सुरक्षा संस्थांच्या सदस्यांचे लसीकरणास प्राधान्य द्यावे.
6) ग्राम समिती / प्रभाग समितीने
45 वर्षापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण 100% पूर्ण करणेकामी
आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणे.
ऑनलाईन नोंदणी केलेले जेष्ठ नागरिक व व्याधिग्रस्त नागरिक
घेणेबाबत तसेच शेवटी स्पॉट
नोंदणी करीता आलेले लाभार्थी घेणेबाबत आरोग्य यंत्रणेमार्फत सुक्ष्म
नियोजन करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.