कोल्हापूर,
दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर
दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8 लाख 66 हजार 757
नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण 40 हजार 565
हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 21 हजार 36 जणांनी दुसरा डोस घेतला. 53 हजार
666 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 20 हजार 955 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच
60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख
73 हजार 707 नागरिकांनी पहिला डोस तर 41 हजार 760 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 89 हजार 837 नागरिकांनी पहिला डोस तर 82 हजार 197
जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 66 हजार 757 जणांनी पहिला डोस तर 1
लाख 66 हजार 32 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.