कोल्हापूर,
दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या
युवा शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे एकूण आठ युवक
शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार या वर्षापासून नव्याने देण्यात येणार आहे.
यासाठी सर्व शेतकऱ्यांनी, शेतकरी गट/संस्थांनी मार्गदर्शक सुचनांचे अधिन राहून कृषी
पुरस्कारासाठीचा आपला परिपुर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजिकच्या कार्यालयात दि.
30 जूनपर्यंत सादर करावा, असे आवाहन पुण्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी केले
आहे.
विविध कृषी पुरस्कारांच्या मार्गदर्शक सुचना कृषी
विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणा-या शेतक-यास अथवा संस्थेस शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित विविध
पुरस्कार देण्यात येतात.
डॉ.
पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार- 1 (राज्यातून एक) -रक्कम 75 हजार रू.
वसंतराव नाईक
कृषीभुषण पुरस्कार -8 (आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण 8) रक्कम-
50 हजार रू., जिजामाता कृषिभूषण पुरस्कार-(आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक
याप्रमाणे एकुण 8) रक्कम-50 हजार रू., कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार-(आठ कृषी
विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण 8) रक्कम-50 हजार रू., युवा शेतकरी पुरस्कार--(आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण 8) रक्कम-30 हजार रू., वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार-(आठ कृषी विभागातून
प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण 8) रक्कम-30 हजार रू., उद्यान पंडीत पुरस्कार-(आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण 8) रक्कम- 25 हजार रू., वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-(आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण 8) रक्कम- 11 हजार रू., पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार-(आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक
याप्रमाणे एकुण 8) रक्कम- 11 हजार रू.,
अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहनही
कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.