कोल्हापूर,
दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) :
आतापर्यत
लॉकडाऊनमध्ये कोल्हापूरकरांनी जसा सयंम बाळगला तसा यापुढेही बाळगून प्रशासनाला
सहकार्य करावे. नागरिकांच्या प्रतिसादाशिवाय हे शिवधनुष्य पेलणे शक्य नाही. तेव्हा
सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून वागावे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग याचा
वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
जिल्ह्यात
टेस्टिंगचे प्रमाण वाढवल्याने रूग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र दिसत असले तरी
नागरिकांनी घाबरू नये, तसेच या ठिकाणी ॲडमीट होणारे बरेचसे रूग्ण हे लगतच्या
जिल्ह्यातील असल्याने रूग्णसंख्या वाढल्याचे दिसते. नागरिकांनी कोरोनबाबत लक्षणे
दिसताच वेळीच उपचार घ्यावेत. तपासणी आणि उपचारास विलंब करू नये. त्याचबरोबर दुखणे
अंगावर काढू नये. आवश्यकता असेल तरच नागरिकांना घराबाहेर पडावे अन्यथा पडू नये.
कोरोनाचे स्प्रेडर होऊ नये. एकत्रित गर्दी करू नये. जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात
ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
म्युकर
मायकोसिसचाही मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून त्यासाठी
सी.पी.आर.रूग्णालयासह इतर रूग्णालयातही या आजाराच्या रूग्णांवर उपचार केले जाणार
आहेत. जिल्ह्यातील नेत्र रोग तज्ज्ञांना माझे आवाहन आहे की, त्यांनी नागरिकांमध्ये
मोठ्या प्रमाणात जनजागृती, प्रबोधन करावे. ‘कोल्हापूरवासिय’ लढवय्ये आहेत. त्यांनी
या सर्व लढ्यात प्रशासनाला साथ द्यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.