कोल्हापूर,
दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : तिसरी लाट येईल का ? आणि आली तर
जिल्ह्यातील लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल या विषयी सध्या अंदाज आहेत पण
आपण सावध असले पाहिजे. त्या दृष्टीने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी
जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी हॉस्पिटल्सनी सज्ज रहावे, त्याचबरोबर जिल्ह्यातील
कोविड हॉस्पिटल्सनी फॅसिलिटी ॲप दैनंदिन मेंन्टेन(अद्ययावत) करावा याकामी
हलगर्जीपण करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात बालरोग
तज्ज्ञांच्या दूरदृष्यप्रणाली व्दारे (व्ही. सी) आयोजित करण्यात आलेल्या आढावा
बैठकीत दिले.
पुढे ते म्हणाले, जिल्ह्यात
ऑक्सीजन पुरेसा साठा आहे. तथापि जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ हॉस्पीटल तसेच याकामी
ज्या हॉस्पीटलची सेवा घेण्यात येणार आहे. त्या हॉस्पीटलनी प्रत्येकी 10 लिटरचे 5
ते 10 ऑक्सीजन कॉन्सट्रेटर घेवून ठेवावेत. जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार
नाही. भविष्यातील संभाव्य स्थिती लक्षात घेवून केवळ बालरोग तज्ज्ञांनीच व इतर
रूग्णालयांनीही कोविड बाल रूग्ण उपचार देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे.
याकामी प्राधान्य देण्यात यावे. तसेच याबाबत संबंधित रूग्णांलयानी मायक्रोप्लॅनिंग
करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्ह्यात किमान 1 हजार बेडची
तयारी करावी लागेल. त्याचबरोबर साधे आणि ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी लागेल.
त्याचबरोबर तालुकानिहाय बेडची उपलब्धता करावी लागेल, असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. योगेश साळे यांनी व्यक्त केले. आयसोलेशन, होम केअर करताना रूग्णांची अतिशय
काळजी घ्यावी लागेल. तसेच या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी सुमारे 190 च्या
आसपास आयसीयू बेड लागतील. सध्या जिल्ह्यातील ओटू बेडचा आपण आढावा घेतला असल्याची
माहिती सीपीआर रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. संगिता कुंभोजकर यांनी
माहिती दिली.
यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ.
कांदबरी बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब
गलंडे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगश साळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक
पोळ आदी प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील इतर मान्यवर बालरोग्य तज्ज्ञ व्ही सी व्दारे
उपस्थित होते.
सोबत – फोटो जोडला आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.