कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : कोरोना विषयी वर्तविण्यात आलेल्या तिसऱ्या
लाटेचे संकट जिल्ह्यावर आलेच तर, त्याची पूर्वतयारी म्हणून ‘मिशन ऑक्सीजन’ अंतर्गत
जिल्ह्यात 14 ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यात जिल्हा
नियोजनमधून सी. पी. आर, आयसोलेशन रुग्णालय, आय. जी. एम, उपजिल्हा रुग्णालय कोडोली,
ग्रामीण रुगणालय गारगोटी, मलकापूर, राधागनरी येथे प्राणवायू निर्मिती प्रकल्प तर उपजिल्हा
रुग्णालय गडहिंग्लज येथे प्राणवायू बुस्टर प्रकल्पाचा समावेश आहे. उपजिल्हा
रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय शिरोळ, चंदगड, आजरा, कागल आणि गगनबावडा येथील
पी. एस. ए. प्राणवायू निर्मिती
प्रकल्प राज्य शासनाकडे प्रस्तावित करण्यात आले आहेत, अशी
माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
जिल्ह्याची 50.93 मे.टन प्राणवायूची एकूण मागणी आहे.
सद्यस्थितीत 35 मे. टन प्राणवायूचा पुरवठा होत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री.
पाटील म्हणाले, जिल्ह्यातील दैनंदिन
रुगणांची वाढ लक्षात घेवून 63.66 मे.टन इतक्या प्राणवायूची उद्या गरज लागणार
आहे. प्रस्तावित व ऑक्सीजन जनरेशनमधून 23 मे. टन प्राप्त होणार आहे.
ऑक्सीजन क्षमता सद्यस्थिती
अ.नं. |
कार्यरत
ऑक्सीजन प्लॅन्ट नाव व ठिकाण |
ऑक्सीजन
साठवणूक क्षमता |
1 |
सी.पी.आर.
सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर |
20 के.
एल. लिक्वीड टँक |
2 |
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर |
6 के. एल.
लिक्वीड टँक |
3 |
उपजिल्हा
रुग्णालय गडहिंग्लज |
पी. एस.
ए. प्रकल्प 729 एल. पी. एम. प्राणवायू निर्मिती प्रकल्प |
4 |
इंदिरा
गांधी रुग्णालय, इचलकरंजी |
6 के. एल.
लिक्वीड टँक |
5 |
संजय
घोडावत, कोवीड काळजी केंद्र अतिग्रे |
6 के. एल.
लिक्वीड टँक |
* जिल्हयातील 136 कोवीड हॉस्पीटल व सेंटर्स मार्फत
ऑक्सीजन ची व्यवस्था आहे.
* प्रस्तावित प्राणवायू
निर्मिती प्रकल्प मधून 23 इतक्या मे
टन प्राप्त होणार आहे.
* प्रस्तावित प्राणवायू
निर्मिती प्रकल्प मधून अंदाजे 1800 प्रतिदिवस
इतके सिलेंडर भरण्याची क्षमता निर्माण होणार आहे. यातून 1200
इतक्या रुग्णांच्या प्राणवायूची गरज यातून भागणार आहे.
* कोल्हापूर जिल्हयातून
सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, निपाणी, बेळगाव भागात प्राणवायू पुरवठा होतो.
* जिल्हा नियोजन समितीच्या
माध्यमातून जिल्हयात 8 ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
यासाठी रुपये 676.37 लक्ष इतका खर्च अपेक्षीत आहे.
* राज्यशासना मार्फत 6 ठिकाणी
प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी
रुपये 560 लक्ष इतका खर्च अपेक्षीत आहे.
जिल्हा नियोजन समितीमधून प्रस्तावित
1) छत्रपती प्रमिलाराजे
जिल्हा रुग्णालय - 87.5 NM3/Hr इतक्या क्षमतेचा प्राणवायू
निर्मिती प्रकल्प तयार करण्यात येत असून त्याव्दारे 300 सिलेंडर प्रतिदिवस
निर्मिती होणार आहे. यासाठी एकूण 196.24 लक्ष इतका खर्च येणार आहे.
2) आयसोलेशन रुग्णालय – 10.80 क्युबीक मीटर प्रतिदिवस 150 सिलेंडर
प्रतिदिवस निर्मिती होणार आहे. यासाठी एकूण खर्च 80.75 लक्ष इतका होणार आहे. या
प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून काम प्रगतीपथावर असून
महिनाभरात पूर्ण होणार आहे.
3)
इंदिरा
गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी -58.33 NM3/Hr
इतक्या क्षमतेचा प्राणवायू निर्मिती
प्रकल्प तयार करण्यात येत असून त्याव्दारे 200 सिलेंडर प्रतिदिवस निर्मिती होणार आहे. या
साठी एकूण 130.83 लक्ष इतका खर्च येणार आहे.
4)
उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे 43.75
NM3/Hr इतक्या क्षमतेचा प्राणवायू निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. त्याव्दारे
150 सिलेंडर प्रतिदिवस निर्मिती होत आहेत. ऑक्सीजन बुस्टर रिफीलिंग प्रकल्प
उभारण्यात येत असून 40 सिलेंडर प्रतिदिवस
भरुन देण्याची सोय होणार आहे. यासाठी एकूण 23.98 लक्ष इतका खर्च येणार आहे.
5) उपजिल्हा
रुग्णालय कोडोली येथे 29.17 NM3/Hr इतक्या क्षमतेचा प्राणवायू
निर्मिती प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. त्याव्दारे 100 सिलेंडर प्रतिदिवस
निर्मिती होणार आहे. ऑक्सीजन बुस्टर रिफीलिंग प्रकल्प उभारण्यात येत असून 40 सिलेंडर प्रतिदिवस भरुन
देण्याची सोय होणार आहे. यासाठी एकूण 93.32 लक्ष इतका खर्च येणार आहे
6) ग्रामीण
रुग्णालय गारगोटी येथे 29.17 NM3/Hr इतक्या क्षमतेचा प्राणवायू
निर्मिती प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. त्याव्दारे 100 सिलेंडर प्रतिदिवस
निर्मिती होणार आहे. तसेच ऑक्सीजन बुस्टर रिफीलिंग प्रकल्प उभारण्यात येत असून 40
सिलेंडर प्रतिदिवस भरुन देण्याची सोय होणार आहे. यासाठी एकूण 93.32 लक्ष
इतका खर्च येणार आहे.
7) ग्रामीण
रुग्णालय मलकापूर येथे 29.17 NM3/Hr इतक्या क्षमतेचा प्राणवायू
निर्मिती प्रकल्प तयार करण्यात येत असून त्याव्दारे 100 सिलेंडर
प्रतिदिवस निर्मिती होणार आहे. यासाठी एकूण 69.34 लक्ष इतका खर्च येणार आहे.
8) ग्रामीण
रुग्णालय राधानगरी येथे 29.17 NM3/Hr इतक्या क्षमतेचा प्राणवायू
निर्मिती प्रकल्प तयार करण्यात येत असून त्याव्दारे 100 सिलेंडर प्रतिदिवस
निर्मिती होणार आहे. यासाठी एकूण 69.34 लक्ष इतका खर्च येणार आहे.
या
सर्व प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, जूनपर्यंत ते पूर्ण होतील.
राज्यशासनाकडील प्रस्तावित प्रकल्प
अ.नं. |
कार्यरत प्राणवायू
प्रकल्प नाव व ठिकाण |
प्राणवायू
साठवणूक क्षमता |
अंदाजित
खर्च |
1 |
उपजिल्हा
रुग्णालय गांधीनगर |
PSA unit
500 LPM |
82 लक्ष |
2 |
ग्रामीण
रुग्णालय शिरोळ |
PSA unit
500 LPM |
82 लक्ष |
3 |
ग्रामीण
रुग्णालय चंदगड |
PSA unit
500 LPM |
82 लक्ष |
4 |
ग्रामीण
रुग्णालय आजरा |
PSA unit
500 LPM |
82 लक्ष |
5 |
ग्रामीण
रुग्णालय कागल |
PSA unit
500 LPM |
82 लक्ष |
6 |
ग्रामीण
रुग्णालय गगनबावडा |
PSA unit
500 LPM |
82 लक्ष |
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.