कोल्हापूर,
दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी होत असून यामध्ये
60 वर्षापुढील ज्येष्ठांची सोय व्हावी, त्यांना दिवसभर रांगेत थांबायला लागू नये,
यासाठी त्यांची स्वतंत्र वेगळी रांग करावी, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी
दिली.
जिल्ह्यातील केंद्रांवर सर्वच ठिकाणी 45 ते 60 वयोगटातील
लसीकरणासाठी गर्दी होत आहे. यामध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठांना थांबावे लागते. यात
अनेकजण इतर आजाराने ग्रस्त असतात. अशा ज्येष्ठांची सोय व्हावी. त्यांना त्रास होऊ
नये. त्यांचे लसीकरण सहजरित्या व्हावे, त्यासाठी त्यांची वेगळी स्वतंत्र रांग
करावी अशी सूचना पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत
केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी
भाऊ गलंडे उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.