कोल्हापूर,
दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार कोव्हिड 19
लसीकरण केंद्रावर दिव्यांग व्यक्तिंच्या लसीकरणासाठी नियोजन करण्याचे आवाहन जिल्हा
समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
यासाठी
दिव्यांग व्यक्तिंची स्वतंत्र रांग करून त्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून
द्यावी. लसीकरण सत्राच्या ठिकाणी व्हील चेअर उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी होणारा
खर्च रूग्ण कल्याण समिती अथवा इतर निधीतून करण्यात यावा. ज्येष्ठ नागरिक, आजारी
व्यक्ती व दिव्यांग व्यक्ती यांचेसोबत एक मदतनीस लसीकरणाच्या सत्राच्या ठिकाणी
उपस्थित. कोणतीही दिव्यांग व्यक्ती लसीपासून वंचित राहणार नाही याबाबत ग्रामीण व
शहरी भागातील आरोग्य कर्मचारी यांचेकडून खात्री करून घ्यावी, असेही श्री. घाटे
यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.