कोल्हापूर,
दि. ८ (जिमाका)- ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं असतील तर पुढचा धोका
टाळण्यासाठी त्वरित शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्या. आजअखेर 394 जणांचे स्वॅब
तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी केवळ तीनच पॉझीटिव्ह अहवाल आले आहेत.
त्यामुळे घाबरु नये, तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी
आज केले.
जिल्ह्यामध्ये
आजअखेर तीन रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई, पुणे तसेच अन्य ठिकाणाहून जिल्ह्यामध्ये
आलेल्या अनेकांचे 14 दिवसाचे अलगीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, ताप, सर्दी, खोकला
अशी कोणतीही लक्षणं आढळून आल्यास त्वरित शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा आणि
तपासणी करुन घ्यावी. आजअखेर 394 जणांचे स्वॅब घेतलेले आहेत त्यापैकी फक्त तिघांचे
नमुने पॉझीटिव्ह आले आहेत. उर्वरित निगेटीव्ह आणि नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे
काळजीचं कारण नाही. परंतु पुढचा धोका टाळायचा असेल तर आताच ज्याला लक्षणं असतील
अशांनी आयजीएम इचलकरंजी, उप जिल्हा रुग्णालय गडहिंग्लज किंवा सीपीआर येथे संपर्क
साधावा. तपासणीसाठी घरातून आणून पुन्हा सोडण्याची व्यवस्थाही केली जाईल. पहिला
धोका हा आपल्या कुटुंबाला आहे हे लक्षात ठेवून थोडं जरी लक्षण असेल त्वरित संपर्क
करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
0 0 0 0 0 00
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.