कोल्हापूर,
दि. 7 (जिमाका)- केवळ 331 शेतकऱ्यांनी परवाना पत्राची मागणी केली होती. 120 जणांना
भाजीपाला वितरणासाठी, 334 कृषि सेवा केंद्र चालकांच्या मागणीनुसार असे एकूण 785 परवाना पत्रे वितरित करण्यात
आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.
केंद्र
सरकारने कृषीशी निगडित सर्व कामे संचारबंदी मधून वगळली आहेत. यामध्ये शेती,
भाजीपाला, फळे, खते, बी-बियाणे, कीटकनाशके व कृषी अवजारे, त्याचे स्पेअर पार्ट, खत
कारखाने चालू ठेवणे इत्यादीचा समावेश आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसार
जिल्ह्यातील भाजीपाला फळे, कृषीजन्य वस्तू, दूध, बी-बियाणे, खते इत्यादीचा पुरवठा
सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास कृषी विभागाला प्राधिकृत केलेले आहे.
6
एप्रिलअखेर जिल्ह्यात केवळ 785 परवानापत्रे वितरित करण्यात आलेली आहेत.
जिल्ह्यामधील केवळ ३३१ शेतकऱ्यांनी परवाना पत्रांची मागणी केली व ती त्यांना
देण्यात आली. १२० लोकाना भाजीपाला वितरणासाठी प्रमाणपत्र देण्यात आली.
त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये सुमारे ४००० पेक्षा अधिक संख्येने कृषी सेवा केंद्रे
कार्यरत आहेत. त्यापैकी 334 कृषी सेवा केंद्र चालकांनी परवानगी मागितली व त्याना
परवानापत्रे देण्यात आलेली आहेत.
विशेष
पोलीस महानिरिक्षक (का.ब.स.) यांनी त्यांचे दिनांक ३१ मार्च २०२० चे पत्रान्वये
मालवाहतूक करणाऱ्या वाहनास परवान्याची गरज
नाही, असे कळविले आहे. सदरचे पत्र दिनांक 3 ते 4 एप्रिलच्या दरम्यान कृषी
विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर अशी परवाना पत्रे देणे कमी करण्यात आले. मात्र
काही ठिकाणी चेक नाक्यावर सदर पत्र दाखवून देखील परवाना पत्राची मागणी केली जात
असल्याची बाब काही शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले नंतर शेतकऱ्यांची गैरसोय होऊ
नये. या करिता अल्प प्रमाणात व आवश्यकता विचारात येऊन परवाने वितरित करण्यात आली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.