स्वयंसेवक बनून परिसरात लक्ष ठेवा
जीवनावश्यक वस्तुंच्या वापरावर मर्यादा ठेवा
- जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर,
दि. 31 (जिमाका)- नागरिकांनी आता स्वयंशिस्तीने
स्वयंसेवक बनून परिसरातील होम क्वॉरंटाईन असणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवलं पाहिजे. जीवनावश्यक वस्तुंसाठी वारंवार घराबाहेर जावं लागू नये, यासाठी
जीवनावश्यक वस्तुंच्या वापरावर मर्यादा ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांनी आज केले.
जिल्ह्यामध्ये आज अखेर दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पुणे,
मुंबईसह देशातील इतर ठिकाणचा याचा वाढता प्रादुर्भाव पाहता याचा सामना करायचा असेल
कोणत्याही परिस्थितीत अत्यावश्यक कारणाशिवाय घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन करुन
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, आपण स्वयंशिस्तीने स्वत:च स्वयंसेवक बना आणि जिल्ह्यामध्ये
मागील पंधरा दिवसात परदेशातून, बाहेर गावाहून, इतर ठिकाणाहून ज्या ज्या व्यक्ती
आलेल्या आहेत या सर्व व्यक्ती आपआपल्या गावात, प्रभागात होम क्वॉरंटाईन राहतील.
कोणाच्याही संपर्कात येणार नाहीत. किंबहुना स्वत:च्या कुटुंबियांच्या संपर्कात
येण्यापासून रोखलं पाहिजे. गावात, प्रभागात फिरता कामा नयेत. अशा व्यक्ती घराबाहेर
फिरत असतील त्याचा प्रादुर्भाव झाला तर रोखणं कठीण काम असेल. स्वयंसेवकांनी अशा
बाहेरुन आलेल्या नागरिकांवर पूर्ण नियंत्रण ठेवलं पाहिजे.
जीवनावश्यक
वस्तुंच्या नावाखाली नागरिक बाहेर पडायची संधी घेत आहेत, ते योग्य नाही. भाजी, दूध
इतर वस्तू असतील अशा जीवनावश्यक वस्तुंचा वापर मर्यादित वापरण्याची वेळ आता आली
आहे. कमीत कमी वेळेसाठी एकदा बाहेर जावून पुन्हा आपल्या घरामध्ये कुटुंबियांसमवेत थांबाव.
जीवनावश्यक वस्तुंचा वापर मर्यादित करावा जेणेकरुन वारंवार बाहेर जायची वेळे येणार
नाही. असं नियंत्रण स्वत:वर ठेवलं, तर
पुढील महत्वाची जे दोन आठवडे आहेत त्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यापासून आपण
यशस्वी होवू, असेही ते म्हणाले.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.