कोल्हापूर, दि. 1 (जि.मा.का) :- शिरोळ तालुक्यात
नव्यानेच शिवभोजन थाळी केंद्र आजपासून सुरु करण्यात आले असून या केंद्राचे उद्घाटन
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष
अमरसिंह माने-पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, शिवभोजन थाळी केंद्राचे चालक
विठ्ठल पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
रोखण्याच्या पार्श्वभूमीवर भुकेल्यांना पोटभर अन्न, तसेच बाहेरगावाहून आलेल्या अनेक मजुरांना, विद्यार्थ्यांना,
स्थलांतरितांना पोटभर अन्न मिळावे, या उद्देशाने शिरोळ येथे शिवभोजन थाळी केंद्रे सुरू आज सुरु
करण्यात आले आहे. या शिवभोजन थाळी केंद्रावर गोरगरीबांना केवळ पाच रुपयात भोजन
मिळणार असल्याची घोषणाही आरोग्य
राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
शासनाने नव्याने निर्णय घेऊन तालुका अथवा शहरस्तरावरही शिवभोजन थाळी केंद्रे सुरू
करण्यास प्राधान्य दिले आहे. या केंद्रामुळे मजुरांना, विद्यार्थ्यांना,
स्थलांतरितांना पोटभर भोजन मिळणार आहे.
शिरोळ या तालुक्याच्या ठिकाणाबरोबरच तालुक्यातील
प्रमुख ठिकाणीही शिवभोजन थाळी केंद्रे सुरु करण्यात येतील असे सांगून आरोग्य
राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर म्हणाले, राज्यातील भुकेल्या माणसाला
अल्पदरात जेवण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
राज्यभरात शिवभोजन केंद्रे सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
घेतला आहे. त्यानुसार शिरोळ येथे हे केंद्र सुरु झाले असून लवकरच दत्त सहकारी साखर
कारखाना कार्यस्थळ शिरोळ, कुरुंदवाड व जयसिंगपूर येथेही शिवभोजन थाळी केंद्रे सुरू
करण्यात येत असल्याचेही राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी सांगितले.
शासनाच्या निर्णयानुसार शिवभोजन थाळी
केंद्रे सुरू करण्याच्या निर्णयामुळे शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखाना
कार्यस्थळावर आज नव्याने शिवभोजन थाळी
केंद्रे सुरू करण्यात आले असून या केंद्राचा शुभारंभ तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ
यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित
होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.