गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

राजीव गांधी नगरमधील मृताचा कोरोना अहवाल निगेटिव्ह



       कोल्हापूर, दि. ९ (जिमाका)-  मार्केट यार्डजवळील राजीव गांधी नगरमधील ४६ वर्षाच्या मृत पुरुष रुग्णाचा कोरोनाचा अहवाल आज निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. 
            येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात १८ ते २५ मार्च या कालावधीत तो उपचारासाठी दाखल झाला होता. त्यानंतर त्याला काल सीपीआरमाध्ये दुपारी ३ वा दाखल करण्यात आले होते. त्याच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्युमोनिया झाल्याचे तसेच यकृताचा गंभीर आजार दिसून आला. त्याच्यावर उपचार सुरु असताना काल दुपारी ४-३० वा त्याचा मृत्यू झाला. त्याचा बाधित देशात, शहरात  प्रवास झालेला नव्हता तसेच कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क झाल्याचा इतिहास नव्हता. तरीही सध्याची कोरोना साथ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज निगेटिव्ह आला. 
0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.