कोल्हापूर, दि.९ (जिमाका)- काही व्यक्ती
अजुनही वेगवेगळ्या मार्गाने जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरुन गावात, शहरात येत
आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या अशा व्यक्तींना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण
करुन त्यांचा स्वॅब घ्या. याला विरोध करणाऱ्या विरोधात पोलीस कारवाई करावी, अशी
सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी श्री. देसाई
यांनी सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांना याबाबत
आज सूचना दिली. अजूनही काही व्यक्ती वेगवेगळ्या मार्गांनी जिल्हाबाहेरुन किंवा
जिल्ह्यातूनही गावात किंवा शहरात चोरट्या मार्गांने येत आहेत. ही अतिशय गंभीर बाबा
आहे. यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका संभवतो.
त्यामुळे अशा बाहेरुन
येणाऱ्या या सर्वांना कोणत्याही परिस्थितीत गावानजीक किंवा निर्धारित केलेल्या
संस्थात्मक अलगीकरण केंद्रात १४ दिवसात सक्तीने ठेवावे. या सर्वांची वैद्यकीय
तपासणी करुन नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात स्वॅब घेण्यात यावा. कोणत्याही
परिस्थितीत या व्यक्ती गावात जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. जर कोणी याला विरोध
करीत असल्यास अशा व्यक्तींवर पोलीस कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
0 00 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.